घरस्पोर्ट्सजुरेलच्या शतकामुळे भारत 'अ'च्या ३४६ धावा

जुरेलच्या शतकामुळे भारत ‘अ’च्या ३४६ धावा

न्यूझीलंड ‘अ’ने दिले ३ बाद २१८ धावा असे प्रत्युत्तर

भारत ‘अ’ आणि न्यूझीलंड ‘अ’ यांच्यात हेग्ले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या ३४६ धावांना उत्तर देताना न्यूझीलंड ‘अ’ने ३ गडी गमावून २१८ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड ‘अ’ची सुरुवात खराब झाली. अवघ्या १३ धावांवर संघाने तीन विकेट गमावल्या. कर्णधार राइस मारियू ४, कर्टिस हीफी ४ आणि टिम रॉबिन्सन ३ धावा करून बाद झाले.

त्यानंतर मॅथ्यू बॉयल आणि डीन फॉक्सक्रॉफ्ट यांनी डाव सावरत चौथ्या विकेटसाठी नाबाद २०५ धावांची भागीदारी केली. बॉयलने १४८ चेंडूंत १४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद १०७ धावा केल्या आहेत. तर फॉक्सक्रॉफ्ट १८० चेंडूंत ८० धावा करून खेळत आहे. भारताकडून मुकेश कुमारने दोन, तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.

हे ही वाचा:

चीनच्या खनिजसंपत्तीत मोठी भर

आली रे आली हिशेबाची वेळ आली!

दिवाळीआधी व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला

भारताच्या नाविकला बळ देणारा एनव्हीएस-०३

यापूर्वी भारत ‘अ’चा पहिला डाव ३४६ धावांवर आटोपला. कर्णधार ध्रुव जुरेलने १०५ धावांची शतकी खेळी केली. दुसऱ्या दिवसअखेर ९९ धावांवर नाबाद असलेल्या जुरेलने तिसऱ्या दिवशी आपले शतक पूर्ण केले. मात्र, त्याला मोठी खेळी करता आली नाही.

आकाशदीपनेही फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने ११६ चेंडूंत १० चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. यापूर्वी देवदत्त पडिक्कलने ८०, तर साई सुदर्शनने ४१ धावांचे योगदान दिले होते.

न्यूझीलंड ‘अ’कडून फ्रेझर सिटने चार विकेट घेतल्या. ब्रेट रँडेल आणि जारोड मॅके यांनी प्रत्येकी दोन, तर ख्रिश्चन क्लार्क आणि जेडन लेनॉक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष असेल. मात्र, आतापर्यंतच्या खेळाचा विचार करता हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version