त्रिपुरातील भारत-बांगलादेश सीमेलगत असलेल्या सिपाहीजाला जिल्ह्यातील बॉक्सानगर येथील आशाबाडी सीमा चौकीजवळ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. या हल्ल्यात कंपनी कमांडर रोहित यांच्यासह चार जवान जखमी झाले आहेत. त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.
सोमवारी (२ नोव्हेंबर) सेपहिजाला जिल्ह्यातील बॉक्सानगर परिसरात ही घटना घडली. तस्करीच्या संशयावरून बीएसएफ जवानांनी एका स्थानिक व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर ग्रामस्थांनी रस्ता अडवून आंदोलन सुरू केले. याचदरम्यान जवानांचे वाहन घटनास्थळी पोहोचताच जमावाने काठ्या आणि बांबूच्या दांडक्यांनी जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात वाहनाचीही तोडफोड करण्यात आली.
हे ही वाचा:
कनेक्टिव्हिटी वाढल्याने पुण्याच्या विकासाला चालना
दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करा!
मंदिरांत पुजारी बलात्कार करतात…नेहा बोराने विष ओकले
माउंट एव्हरेस्ट परिसरात दोन हेलिकॉप्टरची धडक
या प्रकरणी रात्रभर कारवाई करून नऊ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक बिजॉय देबबर्मा यांनी मंगळवारी दिली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य आरोपींनाही लवकरच अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
