घरक्राईमनामाटायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी हरियाणातून तरुणीला अटक

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी हरियाणातून तरुणीला अटक

एकूण आरोपींची संख्या १३ वर

मुंबईतील जुहू परिसरात प्रसिद्ध अभिनेत्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून, हरियाणामधून एका २२ वर्षीय महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता १३ वर पोहोचली आहे. सूत्राच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेली तरुणी ही मुख्य सूत्रधार अनिल पंडितच्या भावाची पत्नी आहे.

दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास जुहू परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केला होता. या घटनेप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.

हे ही वाचा:

‘हिंदू-ज्यू’ ऐक्यामुळे पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरना पछाडले

आंदोलनस्थळावर दीर्घकाळ कब्जा ठेवता येणार नाही!

न्यूझीलंडला धक्का; कॉनवे पहिल्या वनडेतून बाहेर!

भारताचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय ५४.७ अंकांवर

तपासादरम्यान गुन्हे शाखेने यापूर्वी राजस्थानमधील कोटा, दिल्ली तसेच हरियाणामधील सोनीपत येथून १२ आरोपींना गजाआड केले होते. त्यानंतर २७ ऑक्टोबर २०२६ रोजी या गुन्ह्यात ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मकोका – MCOCA) अंतर्गत वाढीव कलमे लावण्यात आली.

पुढील सखोल तपासात या संघटित टोळीच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये हरियाणा येथील एका महिलेचाही थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने हरियाणा पोलिसांच्या मदतीने कर्नाल जिल्ह्यात कारवाई करत १ नोव्हेंबर रोजी या २२ वर्षीय तरुणीला ताब्यात घेऊन अटक केली. सूत्राच्या माहितीनुसार अटक करण्यात आलेली तरुणी ही मुख्य सूत्रधार अनिल पंडित ची बहीण आहे. परंतु पोलिसांनी या बाबत अद्याप खुलासा केलेला नाही.
मुंबई गुन्हे शाखा या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version