घरक्राईमनामाव्हॉट्सॲपवर दिवाळी बोनसच्या नावाने सायबर जाळे

व्हॉट्सॲपवर दिवाळी बोनसच्या नावाने सायबर जाळे

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा सावधगिरीचा इशारा

सणासुदीच्या काळात सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यांना टार्गेट करण्यासाठी नवीन आणि घातक पद्धती अवलंबल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर आणि विशेषतः व्हॉट्सॲपवर एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिवाळीनिमित्त ८,००० रुपयांचा बोनस मिळण्याचे आमिष दाखवले जात आहे. मात्र, हा मेसेज पूर्णपणे बनावट असून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी रचलेले एक सायबर जाळे आहे, असा इशारा केंद्र सरकारच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’ (PIB) च्या फॅक्ट चेक युनिटने दिला आहे.

व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या या मेसेजमध्ये देशाच्या पंतप्रधानांकडून दिवाळीनिमित्त नागरिकांना ८,००० रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जात असल्याचा खोटा दावा केला जात आहे. हा बोनस मिळवण्यासाठी मेसेजमध्ये एक संशयास्पद लिंकही दिली असून, त्यावर क्लिक करून वैयक्तिक व बँक खात्याची माहिती भरण्यास सांगितले जात आहे. मात्र, ही सर्वसामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची वैयक्तिक माहिती चोरण्याची आणि बँक खात्यावर डल्ला मारण्याची सायबर भामट्यांची एक नवी युक्ती आहे.

हे ही वाचा:

रशियाचा युक्रेनच्या शाळेवर दुहेरी हवाई हल्ला; २४ ठार

बीएसएफ जवानांवरील हल्ल्याप्रकरणी नऊ जणांना अटक

कनेक्टिव्हिटी वाढल्याने पुण्याच्या विकासाला चालना

दिया मिर्झाचा व्हिडीओ पुन्हा अपलोड करा!

मात्र, या दाव्यामागील सत्य पूर्णपणे वेगळे आहे. केंद्र सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या पडताळणीत हा व्हायरल मेसेज पूर्णपणे बनावट आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने अशा प्रकारचा कोणताही दिवाळी बोनस किंवा आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही संशयास्पद मेसेजवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये आणि त्यातील कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याची चूक करू नये.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version