पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (PTI) संस्थापक इमरान खान यांच्या सुटकेच्या मागणीसाठी पक्षाने इस्लामाबादकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या राजधानीत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. प्रमुख रस्ते आणि महामार्गांवर कंटेनर लावून मार्ग बंद करण्यात आले असून हजारो सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र, पीटीआयने आता हा मोर्चा ४ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलला आहे.
पक्षाने सुरुवातीला २७ सप्टेंबरला इस्लामाबादकडे मोर्चा काढण्याची तयारी केली होती. या आंदोलनाचा मुख्य उद्देश इमरान खान यांच्या सुटकेची मागणी करणे आणि त्यांच्या तुरुंगातील परिस्थितीबाबत सरकारवर दबाव आणणे हा असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. शुक्रवारी पीटीआयच्या राजकीय समितीच्या बैठकीनंतर खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी मोर्चा ४ ऑक्टोबरला पेशावरहून सुरू होईल, अशी घोषणा केली.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. राजधानीकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर १ हजारांहून अधिक कंटेनर लावण्यात आले असून काही कंटेनरना लोखंडी काटे लावण्यात आल्याचे वृत्त आहे. पुलांवर वाळूच्या पोत्यांची व्यवस्था करण्यात आली असून प्रमुख महामार्गही बंद करण्यात आले. इस्लामाबादमध्ये सुमारे २२ हजार पोलीस आणि इतर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.
🇵🇰 Pakistan is lining Attock Bridge with metal spikes to stop Imran Khan's supporters from marching on Islamabad this Sunday.
The bridge is the main crossing between Khyber Pakhtunkhwa and Punjab, where PTI's caravan is set to start its march demanding Khan's release from jail.…
— Mario Nawfal (@MarioNawfal) September 25, 2026
हे ही वाचा:
नागालँडमध्ये बनावट दारूच्या सेवनानंतर १९ जण दगावले
‘लालबागच्या राजा’ला भावपूर्ण निरोप!
जम्मू-काश्मीर विधानसभेत राडा; भाजप आमदाराला काढले बाहेर
राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर
खैबर पख्तूनख्वा आणि पंजाबला जोडणाऱ्या अटक पुलावरही आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली. इस्लामाबादकडे जाणाऱ्या मार्गांवर अडथळे उभारण्यात आले असून प्रशासनाने राजधानीतील सार्वजनिक सभा आणि जमावावर निर्बंध लागू केले आहेत. या उपाययोजनांमुळे शहरातील वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पीटीआयचे नेते आणि खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी इमरान खान यांच्या सुटकेची मागणी कायम ठेवली आहे. सरकारने खान यांच्या तुरुंगातील परिस्थितीत महत्त्वपूर्ण बदल केले नाहीत, तर आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली होती.
