घरदेश दुनियाअमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील ‘एम’ फॅक्टर

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीतील ‘एम’ फॅक्टर

मुस्लिम मतदारांचा वाढता सहभाग

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये मुस्लिम-अमेरिकन मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल्याचे प्राथमिक आकडेवारीतून समोर आले आहे. मुस्लिम नागरिकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कौन्सिल ऑन अमेरिकन-इस्लामिक रिलेशन्स (CAIR) या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या मतदार संपर्क यादीतील २ लाख ५० हजार ९९ मतदारांपैकी ८८ हजार १४८ जणांनी मतदान केले होते. म्हणजेच या यादीतील ३५.२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

माहितीनुसार, सहा राज्यांमध्ये २०२२ च्या मध्यावधी निवडणुकांच्या तुलनेत यंदा या संपर्क यादीतील मतदारांनी आधीच २४ टक्के अधिक मतदान केले होते. निवडणुकीपूर्वी CAIR आणि CAIR Action यांनी केलेल्या सर्वेक्षणातही मतदानाची तीव्र इच्छा दिसून आली होती. १६ ते २५ ऑक्टोबरदरम्यान ८६१ मुस्लिम मतदारांच्या प्रतिसादांवर आधारित या सर्वेक्षणात ८१ टक्के जणांनी आपण निश्चित मतदान करणार असल्याचे, तर आणखी ९ टक्के जणांनी मतदान करण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. २०२२ मध्ये मतदान न केलेल्या प्रतिसादकांपैकी ७४ टक्के जणांनी यंदा निश्चित मतदान करणार असल्याचे म्हटले होते. अर्थात, हे आकडे मतदानाचा इरादा दर्शवतात; प्रत्यक्ष मतदानाची अंतिम संख्या नव्हे.

हे ही वाचा:

ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांचे निधन

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या नेत्यांची विजयी हॅट्ट्रिक

बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांच्याविरोधात गुन्हा

‘चलो दिल्ली’ रॅलीला दांडी मारणारे काँग्रेसचे ८३ पदाधिकारी निलंबित

दरम्यान, मुस्लिम उमेदवारांनीही या निवडणुकीत यश मिळवले आहे. मिशिगनमधून डेमोक्रॅटिक पक्षाचे अब्दुल एल-सय्यद यांनी सिनेटची निवडणूक जिंकली. त्यामुळे अमेरिकी सिनेटवर निवडून जाणारे ते पहिले मुस्लिम ठरले. प्रतिनिधीगृहात इल्हान उमर, रशीदा तलैब, लतीफा सायमन आणि आंद्रे कार्सन या चार विद्यमान मुस्लिम खासदारांनी आपापल्या जागा कायम राखल्या. याशिवाय, न्यू जर्सीमधून ऍडम हमावी आणि न्यूयॉर्कमधून डारियालिझा अविला शेव्हालियर यांनीही विजय मिळवला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version