घरदेश दुनियाअमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या नेत्यांची विजयी हॅट्ट्रिक

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या नेत्यांची विजयी हॅट्ट्रिक

पिया डांडिया, सुहास सुब्रमण्यम, अरुणा मिलर यांचा विजय

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या तीन नेत्यांनी विजय मिळवला आहे. फ्लोरिडातून पिया डांडिया, व्हर्जिनियातून सुहास सुब्रमण्यम आणि मेरीलँडमधून अरुणा मिलर यांनी आपापल्या निवडणुकांमध्ये बाजी मारली. ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर जाहीर झालेल्या निकालांमुळे अमेरिकेच्या राजकारणातील भारतीय-अमेरिकन नेत्यांची उपस्थिती पुन्हा चर्चेत आली आहे.

फ्लोरिडातून पिया डांडिया यांचा विजय

डेमोक्रॅटिक पक्षाच्या पिया डांडिया यांनी फ्लोरिडातून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाची निवडणूक जिंकली. त्यांनी रिपब्लिकन उमेदवार केसी ऑस्कर यांचा पराभव केला. पिया यांना ५१.९ टक्के मते मिळाली. त्यांचे आई-वडील भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले असून, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

हे ही वाचा:

बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांच्याविरोधात गुन्हा

‘चलो दिल्ली’ रॅलीला दांडी मारणारे काँग्रेसचे ८३ पदाधिकारी निलंबित

“मी निवडणूक लढवली असती, तर रिपब्लिकन पक्ष जिंकला असता”

अमेरिकन नागरिकांनी युद्धाला नाकारले!

सुहास सुब्रमण्यम, अरुणा मिलर यांचे यश

डेमोक्रॅटिक पक्षाचे सुहास सुब्रमण्यम यांनी व्हर्जिनियातील आपली जागा कायम राखली. त्यांनी यापूर्वी माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे सल्लागार म्हणून काम केले आहे. मेरीलँडच्या लेफ्टनंट गव्हर्नर अरुणा मिलर यांनीही रिपब्लिकन उमेदवार रॉब क्रॉप यांचा पराभव करत पुन्हा विजय मिळवला. हैदराबादमध्ये जन्मलेल्या मिलर या या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय-अमेरिकन महिला आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version