कॉंग्रेसच्या नेतृत्वात इंडी आघाडीने कथित मतचोरी आणि निवडणुकीतील अनियमिततेच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर रोजी ‘चलो दिल्ली’ रॅली काढली होती. दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला गैरहजर राहिल्याने कॉंग्रेस पक्षाने युवक काँग्रेसच्या सुमारे ८३ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मध्य प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश युवक काँग्रेसने ही कारवाई केली आहे.
मध्य प्रदेश युवक काँग्रेसने उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांसह ६० पदाधिकाऱ्यांना निलंबित केले. त्यानंतर हरियाणा युवक काँग्रेसने १०, तर हिमाचल प्रदेश युवक काँग्रेसने १३ पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली. त्यामुळे निलंबित पदाधिकाऱ्यांची एकूण संख्या सुमारे ८३ झाली आहे.
हे ही वाचा:
“मी निवडणूक लढवली असती, तर रिपब्लिकन पक्ष जिंकला असता”
अमेरिकन नागरिकांनी युद्धाला नाकारले!
मध्यावधी निवडणुकात ट्रम्प यांनी गमावले अनेक बालेकिल्ले
ऍड. गौरी भिडेंकडून वडिलांच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन
या रॅलीच्या माध्यमातून कथित निवडणूक अनियमिततेचा निषेध करण्याबरोबरच पक्षाने मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, मोठ्या गर्दीचे आश्वासन देऊनही प्रत्यक्षात उपस्थिती अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे समोर आले. रॅलीला केवळ सुमारे १ हजार ३६ पदाधिकारी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
