घरदेश दुनियातीन बड्या वृत्तसंस्थांना व्हाईट हाऊसचे दरवाजे बंद!

तीन बड्या वृत्तसंस्थांना व्हाईट हाऊसचे दरवाजे बंद!

‘खोट्या बातम्या’ देत असल्याचा ट्रम्प यांचा आरोप

- Advertisement -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीएनएन, एमएस नाऊ आणि पॉलिटिको या तीन वृत्तसंस्थांना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेशबंदी करण्याची घोषणा केली आहे. या वृत्तसंस्था त्यांच्या प्रशासनाबाबत वारंवार ‘खोट्या बातम्या’ प्रकाशित करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ही बंदी तात्काळ लागू होत असल्याचे त्यांनी शुक्रवारी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये म्हटले.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये सीएनएन, एमएस नाऊ आणि पॉलिटिको यांच्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प प्रशासन आणि अमेरिकेबाबत ‘काल्पनिक आणि खोट्या’ बातम्या प्रकाशित केल्याचा आरोप केला. तसेच या वृत्तसंस्थांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगताना, भविष्यात आणखी काही माध्यम संस्थांवरही अशाच प्रकारची बंदी घातली जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

पॉलिटिकोला देण्यात आलेल्या ८० लाख डॉलरच्या सरकारी वर्गणीचाही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला. ही रक्कम जो बायडेन यांच्या प्रशासनाच्या काळात देण्यात आल्याचा दावा करत ट्रम्प यांनी या व्यवहारावर प्रश्न उपस्थित केला. मात्र, पॉलिटिकोने हा दावा चुकीचा असल्याचे म्हटले असून, यासंदर्भातील आरोप यापूर्वीच खोडून काढण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर ओव्हल कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी या निर्णयावर अधिक भाष्य केले. “मला ते माझ्या कार्यालयात नको आहेत. मला ते इथे नको आहेत,” असे ते म्हणाले. ही बंदी “शक्य तितकी कठोर” असेल, असेही त्यांनी सांगितले. वारंवार खोट्या बातम्या प्रकाशित केल्या जात असतील, तर अशा माध्यमांना व्हाईट हाऊसपासून दूर ठेवण्याचा अधिकार कोणालातरी असला पाहिजे, असे ट्रम्प यांनी म्हटले.

हे ही वाचा:

ग्रीनलँडच्या सुरक्षेवर अमेरिकेचे ‘कायमस्वरूपी नियंत्रण’!

परीक्षेत चॅटजीपीटी वापरताना पकडल्यानंतर विद्यार्थ्याची आत्महत्या

निकेत कौशिक यांनी घेतले करूळकरांच्या विघ्नहर्त्याचे दर्शन

तिरुपती लाडू प्रकरणी ‘सुकृती फूड्स’च्या प्रवर्तकाला अटक

दरम्यान, सीएनएनने ट्रम्प यांच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हाईट हाऊसमधील आपल्या पत्रकारांच्या कामाचे समर्थन करताना, अमेरिकेच्या संविधानानुसार कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय वृत्तांकन करण्याचा अधिकार असल्याचे सीएनएनने म्हटले. प्रस्तावित बंदी ही पत्रकारितेच्या घटनात्मक अधिकारांवरील ‘बेकायदेशीर हल्ला’ ठरेल, असे सीएनएनने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version