घरराजकारणविषयापासून पळ न काढता चौकशीला सामोरे जा

विषयापासून पळ न काढता चौकशीला सामोरे जा

ईडी चौकशी आणि छापेमारी यांचा संबंध राजकारणाशी लावणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यावर कारवाई होत असते, असं सांगतानाच मूळ विषयापासून पळ न काढता एकनाथ खडसे यांनी चौकशीला सामोरे जावे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

प्रवीण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. माझ्यावरील कारवाईमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझी चौकशी सुरू आहे, असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यावर दरेकर यांनी पलटवार केला आहे. ईडीची कारवाई कोणत्याही सुडभावनेने होतं नसते. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकारण करत मूळ विषयापासून पळ न काढता खडसे यांनी चौकशीला समोरं जायला हवं, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

कुठलीही व्यक्ती चौकशीपासून पळ काढून आपल्या बचावाकरीता मार्ग शोधत असते. तेव्हा या सर्व प्रकरणातून संशयाला बळकटी मिळते. आपला जर दोष नसेल तर योग्य ती कागदपत्र सादर करून आपलं निर्दोषत्व सिद्ध करा. तसेच कोणत्याही चौकशीला सहकार्य करणं उत्तम ठरेल, असा सल्लाही दरेकर यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

नवे मंत्री अश्विनी वैष्णव पहिल्याच दिवशी ऍक्शन मोडमध्ये

‘या’ प्रश्नावर फडणवीस भडकले

‘या’ देशातल्या विद्यमान राष्ट्रपतींची हत्या

मस्त! मत्स्य पालनासाठी आता मत्स्य सेतू!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये होते. त्यांनीही ईडीकडून खडसेंची चौकशी होत असल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे सुडाने काम करण्याची प्रथा नाही, असं फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version