घरधर्म संस्कृतीचार धाम देवस्थान बोर्ड होणार बरखास्त?

चार धाम देवस्थान बोर्ड होणार बरखास्त?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देवभूमी उत्तराखंडमध्ये आहेत. उत्तराखंडमधील आदी शंकराचार्य यांच्या समाधीचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. तर आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झाले. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तब्बल ४०० कोटींची विकासकामे जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगली असून उत्तराखंडच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या दृष्टीनेही हा दौरा खूप महत्वाचा समजला जात आहे.

या आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी चार धाम देवस्थान बोर्डाच्या संदर्भात काही महत्वाची घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमनोत्री अशा चार धामचे पुजारी त्रिवेंद्र रावत यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात लागू झालेल्या देवस्थानम बोर्ड कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्यानुसार, चार देवस्थानांशी संबंधित ५१ मंदिरे दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या देवस्थानम मंडळाद्वारे नियंत्रित केली जातात.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी आज देवभूमीत

महाराष्ट्रात कधी होणार पेट्रोल डिझेलच्या दरात घट?

केदारनाथचा ‘हा’ प्रश्न मार्गी लागला

दिवाळी हा अमेरिकेतही ‘राष्ट्रीय उत्सव’

उत्तराखंड सरकारच्या या निर्णयाला राज्यातून प्रचंड विरोध होत असून आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला याचा फटका बसू शकतो अशी शक्यता जाणकार वर्तवत आहेत. चार धाम मंदिरे ही देवस्थान समितीच्या अधिपत्यातून मुक्त व्हावीत यासाठी तेथील पुजारी आणि नागरिक प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या आपल्या दौऱ्याच्या निमित्ताने या विषयात एखादी महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या आधी या मंदिरांचे पुजारी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे समजत होते. पण या सर्व महंत, पुजाऱ्यांशी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी संवाद साधत त्यांची समजूत काढली आणि मने वळवली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version