घरराजकारणतामिळनाडू सरकारची दीपम प्रज्वलन प्रकरणी न्यायालयात माफी

तामिळनाडू सरकारची दीपम प्रज्वलन प्रकरणी न्यायालयात माफी

मंदिर विश्वस्त मंडळावर फोडले खापर

तामिळनाडूतील तिरुपरनकुंद्रम टेकडीवरील वादग्रस्त दीपथून येथे २४ नोव्हेंबर रोजी कार्तिगई दीपम प्रज्वलित न केल्याप्रकरणी तामिळनाडू सरकारने सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली आहे. २० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी धार्मिक दीप प्रज्वलित करण्यास परवानगी दिली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतरही प्रत्यक्षात दीपथूनवर दीप प्रज्वलित करण्यात आला नाही.

सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या स्थितीदर्शक अहवालात मदुराईचे जिल्हाधिकारी निशांत कृष्णा यांनी जिल्हा प्रशासनाने न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचलल्याचे सांगितले. मात्र, दीपथूनवर दीप प्रज्वलित करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पथकाला मंदिराच्या विश्वस्त मंडळाने अधिकृत मान्यता दिली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार हा विधी पार पाडता आला नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

हिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!

चीनच्या अंतराळ मोहिमेत पाकिस्तानी अंतराळवीराचा सहभाग

‘रामायण’ चित्रपट निर्माते, दिग्दर्शकाविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार

नेहरूंना खोटे श्रेय मोदींना खरेही नाही !

जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दीप प्रज्वलनाची पारंपरिक पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आणि नेहमीच्या ठिकाणीच कार्तिगई दीपम प्रज्वलित करण्याचे ठरवले. या प्रकरणी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात जिल्हाधिकारी निशांत कृष्णा यांनी म्हटले आहे की, “दीपथूनवर दीप प्रज्वलित न झाल्याबद्दल मी मनापासून माफी मागतो.”

न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठासमोर हा अहवाल सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायालयात बाजू मांडताना टेकडीवरील दीपस्तंभावर दीप प्रज्वलित करता आला नसल्याची माहिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात काय सांगितले?

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, २० नोव्हेंबरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी केली होती. दीपप्रज्वलनासाठी मंदिर प्रशासनाची अधिकृत परवानगी मिळवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रस्तावित पथकाला मंदिर प्रशासनाकडून मान्यता मिळाली नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “दीपथूनवर दीप प्रज्वलित करण्यासाठी कोणत्या व्यक्तींना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे, याबाबत देवस्थान प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्याही टप्प्यावर माहिती दिली नव्हती.” तसेच देवस्थान प्रशासनाच्या जागी स्वतःहून कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करणे किंवा तिला धार्मिक विधी पार पाडण्याची परवानगी देणे, असा अधिकार जिल्हा प्रशासनाला नसल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

अहवालानुसार, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रशासकीय तयारी पूर्ण झाली होती आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सामान्य होती. उत्सवादरम्यान शांतता राखण्यासाठी एकूण ५,७९७ पोलिस कर्मचाऱ्यांच्या तैनातीची योजनाही तयार करण्यात आली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version