घरराजकारणराहुल गांधी पुन्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार?

राहुल गांधी पुन्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार?

हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भारतात परतण्याची अपेक्षा

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा एकदा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. १६ ते २० नोव्हेंबरदरम्यान त्यांचा हा दौरा होऊ शकतो, अशी माहिती एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. या दौऱ्यात राहुल गांधी न्यूयॉर्क आणि शिकागो येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, भारतीय वंशाच्या नागरिकांशी तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी भारतात परतण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या दौऱ्याची तयारी सुरू असल्याचे समजते. मात्र, दौऱ्याचा अंतिम कार्यक्रम आणि भेटींचे तपशील अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. दरम्यान, राहुल गांधी यांच्या संभाव्य अमेरिका दौऱ्यावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, ते भारतापेक्षा परदेशात अधिक वेळ घालवत असल्याचा आरोप केला. त्यांच्या राजकीय बांधिलकीवरही भंडारी यांनी प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधी यांच्या या संभाव्य दौऱ्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या परदेश दौऱ्यांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये तस्करीचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त, १६ जण अटकेत

इराण युद्धामुळे रिपब्लिकन पक्षाचा पराभव!

अमेरिकेचे नवनिर्वाचित सिनेटर अब्दुल एल-सैयद यांचे कर्नाटकशी खास नाते

दिल्लीत बांधकामाधीन इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version