घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणराहुल गांधींना डोवाल यांची सुपारी मिळाली आहे काय?

राहुल गांधींना डोवाल यांची सुपारी मिळाली आहे काय?

देशातील राजकारण्यांबाबत लोकांच्या मनात कमी-जास्त राग-लोभ असू शकतो. परंतु स्पाय मास्टर, भारताचे जेम्स बाँड, देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबाबत देशातील जनतेच्या मनात भरभरून प्रेम आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंदूर येथे झालेल्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात त्यांच्यावरही शेलकी टीका केली. सत्तातुर राहुल गांधी आजवर त्यांचे नैराश्य भाजपा, संघ आणि मोदी सरकारवर काढत होते. आता त्यांनी डोवाल यांनाही रडारवर घेतले आहे. त्यांनी खरे तर ही चूक करू नये. ज्यांनी पाकिस्तानला पाणी पाजले, त्यांच्यासमोर राहुल गांधी यांची डाळ काय शिजणार? स्क्रिप्ट दिल्याशिवाय राहुल गांधी कोणत्याही विषयावर बोलत नाहीत. डोवाल यांच्याविरोधात बोलण्यासाठी स्क्रिप्टसोबत त्यांना सुपारीही मिळालेली दिसते. अजित डोवाल हे आयपीएस अधिकारी आहेत. पाकिस्तानसारख्या शत्रू देशात त्यांनी ७ वर्षे हेरगिरी केली, यावरून देशासाठी जगण्या-मरण्याची त्यांची तयारी आहे हे स्पष्ट दिसते. आयबीमध्ये अनेक वर्षे सेवा करून निवृत्त झाल्यानंतर मोदी सरकारच्या कार्यकाळात त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी आली. त्याआधी ९ वर्षे त्यांच्याकडे कोणतीही सरकारी जबाबदारी नव्हती. डोवाल यांचे वय आज ८१ वर्षे आहे. वयाच्या खुणा त्यांच्या शरीरावर दिसू लागल्या आहेत. तरीही त्यांना निवृत्त करण्याची मोदींची इच्छा दिसत नाही. या वयातही ते जगभरात दौरे करत असतात. भारताची बाजू मांडत असतात. जगभरातील राष्ट्रप्रमुखही त्यांना आदराने भेटतात, त्यांच्याशी चर्चा करतात.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version