उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटक असलेली कार उभी करणे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी तथा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाने ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सचिन वाझेचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
न्यायलयीन सूत्रांनुसार, या गंभीर गुन्ह्यातील वाझेचा सहभाग आणि प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता त्याला सध्यातरी दिलासा मिळणे शक्य नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या निकालामुळे सचिन वाझेला यापुढेही तुरुंगातच राहावे लागणार असून, त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
यापूर्वी विशेष एनआयए सत्र न्यायालयाने वाझेला जामीन मंजूर केला होता. मात्र, या निर्णयाविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने उच्च न्यायालयात धाव घेत त्याच्या जामीनाला तीव्र विरोध केला होता. आज उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने एनआयएची भूमिका ग्राह्य धरत जामीन अर्ज रद्द केला आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांचा डंका
३३ वर्षांनंतर जंतरमंतर सर्वसामान्यांसाठी खुले!
लष्करासाठी गेमचेंजर ठरणार जीपीएस शिवाय ड्रोनला दिशा देणारे तंत्रज्ञान
