घरविशेषईशान्य भारतातील कर्तृत्ववानांचा होणार गौरव

ईशान्य भारतातील कर्तृत्ववानांचा होणार गौरव

‘नमस्ते अवॉर्ड्स २०२६’चे मुंबईत आयोजन

ईशान्य भारतातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी ‘नमस्ते अवॉर्ड्स २०२६’ या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एनएसई एक्सचेंज प्लाझाच्या ऍट्रियममध्ये हा सोहळा पार पडणार आहे. अमेझिंग नमस्ते फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याला महाराष्ट्राचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि नागालँडचे पर्यटनमंत्री तेमजेन इम्ना अलोंग हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ईशान्य भारतातील सामाजिक, सांस्कृतिक, प्रशासकीय आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे, हा या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.

हे ही वाचा:

मूडीजकडून भारताच्या आर्थिक विकासदराचा अंदाज वाढवला

मॉर्निंग वॉकदरम्यान माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड बेशुद्ध होऊन कोसळले

“जशी वेळ येईल, तशा गोष्टी समजतील!”

सचिनच्या १०० शतकांच्या साक्षीदार बॅट्स आता संग्रहालयात!

या पुरस्कार सोहळ्याच्या पहिल्या आवृत्तीत ईशान्य भारतातील आठ राज्यांमधील पाच व्यक्ती आणि संस्थांना पाच वेगवेगळ्या प्रवर्गांत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये आसामचे डॉ. जोगेश देउरी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मिझोरामचे पॉल एल. खुमा, एमसीएस यांना सार्वजनिक सेवा आणि प्रशासन क्षेत्रातील योगदानासाठी, तर अरुणाचल प्रदेशचे डिमम पर्टिन यांना स्टार्टअप आणि उद्योजकता क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार दिला जाणार आहे. याशिवाय, नागालँडमधील किकरुमा ग्राम परिषदेला शाश्वतता आणि पर्यावरण व्यवस्थापनासाठी, तर मणिपूरचे युमनाम भूमेश्वर सिंग यांना संस्कृती जतन आणि संवर्धनातील योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version