घरविशेषजसपाल राणाच्या मृत्यूनंतर आईनेही प्राण त्यागले

जसपाल राणाच्या मृत्यूनंतर आईनेही प्राण त्यागले

भारतीय नेमबाजी क्षेत्रावर आणखी एक दुःखद आघात झाला आहे. दिग्गज नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर त्याच्या धक्क्यातून त्यांचे कुटूंब सावरण्यापूर्वी जसपाल यांच्या मातोश्री श्यामा देवी राणा यांचे नवी दिल्लीत वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले. त्या लष्करी रुग्णालयात उपचार घेत होत्या. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, १२ जून रोजी जसपाल राणा यांच्या निधनानंतर श्यामा देवी राणा यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. मुलाच्या निधनाचा मानसिक धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यानंतर काही दिवस त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

हे ही वाचा:

मोदी-ट्रम्प जी-७मध्ये भेटले, पण हरवला जोश!

“हिजबुल्लाहशी लढाई सीरियाने हाताळावी”

भारताकडून हार, पाकिस्तानला दंड

मेस्सी-रोनाल्डोच्या सहाव्या विश्वचषकाची उत्सुकता

श्यामा देवी राणा या नारायण सिंग राणा यांच्या पत्नी होत्या. नारायण सिंह राणा हे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते तसेच उत्तराखंडचे माजी क्रीडामंत्री होते.

राणा कुटुंबाने भारतीय नेमबाजी आणि क्रीडा प्रशासन क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे श्यामा देवी राणा यांच्या निधनामुळे या कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अल्पावधीतच जसपाल राणा आणि त्यानंतर त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने भारतीय क्रीडा क्षेत्रात शोककळा पसरली असून देशातील सर्वात प्रतिष्ठित नेमबाजी कुटुंबांपैकी एका कुटुंबावर दुहेरी दुःख कोसळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version