घरविशेषगणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शासनाचा निर्णय

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ बाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात या महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. परिवहन विभागाकडून यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. एसटी महामंडळाकडूनही अतिरिक्त बसेस चालवल्या जातात. त्याचवेळी खासगी वाहनांची वर्दळ वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा ताण निर्माण होतो. त्यात अवजड वाहने, ट्रेलर तसेच वाळू आणि रेती वाहून नेणाऱ्या वाहनांची भर पडल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी मोटार वाहन अधिनियमातील तरतुदींनुसार निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

कोणत्या काळात निर्बंध?

  • गणेशमूर्तींचे आगमन आणि उत्सवपूर्व प्रवास लक्षात घेऊन ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असेल.
  • पाच दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनानंतरच्या परतीच्या प्रवासासाठी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत निर्बंध लागू राहतील.
  • गौरी-गणपती विसर्जनानंतरच्या परतीच्या प्रवासासाठी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत, तसेच २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत निर्बंध असतील.
  • तर अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतर होणारी मोठी वाहतूक लक्षात घेता २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत.

हे ही वाचा:

ऍमेझॉन, इन्स्टामार्टच्या गोदामांतून १.३८ कोटींचे मुदतबाह्य अन्न जप्त

अवघ्या ११ दिवसांत मोदी-पुतिन पुन्हा आमनेसामने; शुक्रवारी द्विपक्षीय भेट

‘सर तन से जुदा’ ची तुलना ‘जय श्री राम’ घोषणेशी करता येणार नाही!

ऍनिमेशन वापरून पाकिस्तानचा युद्ध जिंकल्याचा बनाव

दरम्यान, जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. जेएनपीटी आणि जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदीतून सूट देण्यात आली आहे. याशिवाय दूध, पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, औषधे, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला, अन्नधान्य आणि नाशवंत वस्तूंची वाहतूक करणारी वाहनेही या निर्बंधांपासून मुक्त असतील. रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अत्यावश्यक सेवांची वाहनेही निर्बंधांच्या कक्षेत येणार नाहीत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version