घरविशेषअहमदाबाद–मंगळुरू ट्रेनला पालघरचा थांबा

अहमदाबाद–मंगळुरू ट्रेनला पालघरचा थांबा

पश्चिम रेल्वेने पालघर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद–मंगळुरू साप्ताहिक स्पेशल ट्रेनला पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे पालघर आणि परिसरातील प्रवाशांना गुजरात तसेच कर्नाटककडे रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा अधिक सुलभ होणार आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०९४२४ अहमदाबाद–मंगळुरू साप्ताहिक स्पेशलला २८ ऑगस्ट २०२६ पासून पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. ही ट्रेन पालघर स्थानकावर रात्री १०.०२ वाजता पोहोचेल आणि १०.०४ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९४२३ मंगळुरू–अहमदाबाद साप्ताहिक स्पेशलला २९ ऑगस्ट २०२६ पासून पालघर येथे थांबा मिळणार आहे. ही ट्रेन पालघर स्थानकावर सायंकाळी ७.१० वाजता पोहोचेल आणि ७.१२ वाजता रवाना होईल.

या अतिरिक्त थांब्यामुळे पालघर, बोईसर आणि परिसरातील प्रवाशांना अहमदाबाद तसेच मंगळुरूच्या दिशेने प्रवास करताना मोठी सुविधा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे या मार्गावरील प्रवाशांची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे.

दरम्यान, ट्रेनच्या वेळा, विविध स्थानकांवरील थांबे तसेच कोच संरचनेची सविस्तर माहिती प्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version