घरविशेष... म्हणून सिंगल- सीट तेजस विमानांचा संपूर्ण ताफा ग्राउंड!

… म्हणून सिंगल- सीट तेजस विमानांचा संपूर्ण ताफा ग्राउंड!

हवाई दलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

- Advertisement -

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बनावटीचे तेजस लढाऊ विमानाला अपघात झाला. ब्रेक फेल झाल्यामुळे विमान धावपट्टीवरून खाली घसरले आणि एका खड्ड्यात कोसळले. या अपघातात विमानाचा पायलट सुरक्षित बचावला असून याबद्दल भारतीय हवाई दलाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पीटीआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. या अपघातानंतर हवाई दलाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच जोपर्यंत तांत्रिक तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत तेजस विमानांचे उड्डाण रोखण्यात आले आहे.

माहितीनुसार, ७ फेब्रुवारी २०२६ च्या सुमारास एका प्रशिक्षण मोहिमेवरून परतत असताना तेजस विमानाला लँडिंगच्या वेळी समस्या आली. प्राथमिक तपासानुसार, विमानाची ‘ब्रेक यंत्रणा’ निकामी झाल्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले आणि बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळले. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असून ते पुन्हा सेवेत येण्याची शक्यता कमी आहे. अपघाताची तीव्रता लक्षात घेता वैमानिकाने वेळीच प्रसंगावधान राखले आणि ‘इजेक्शन’ प्रक्रियेद्वारे स्वतःचा जीव वाचवला. वैमानिकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर, भारतीय हवाई दलाने सखोल तांत्रिक चौकशी करण्यासाठी सुमारे ३० सिंगल- सीट तेजस विमानांचा संपूर्ण ताफा ग्राउंड केला आहे, असे वृत्तसंस्था पीटीआयने सांगितले आहे.

हे ही वाचा:

मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज माफिया एल मेंचो मेक्सिकोमधील लष्करी कारवाईत ठार

Gen Z मुळे मद्य उद्योगाला ८३० अब्ज डॉलरचा फटका

महाकुंभसोबत ‘केरळ कुंभ’चा ‘मन की बात’मध्ये उल्लेख

छत्तीसगडमध्ये माओवादी चळवळीला मोठा धक्का

भारतीय हवाई दलात समाविष्ट झाल्यापासून हे तिसरे तेजस विमान जे अपघातग्रस्त झाले आहे. पहिला अपघात मार्च २०२४ मध्ये जैसलमेरजवळ झाला होता जेव्हा जेट अग्निशक्तीच्या प्रात्यक्षिकातून परतत होते; पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला होता. दुसरी घटना नोव्हेंबर २०२५ मध्ये दुबई एअर शोमध्ये एरोबॅटिक प्रदर्शनादरम्यान घडली होती, ज्यामध्ये पायलटचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताची चौकशी अजूनही सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version