सोलापूर विमानतळावर गुरुवारी शिकाऊ विमानाचे हार्ड लँडिंग झाल्याने ते धावपट्टीवर अडकले. या विमानात महिला शिकाऊ वैमानिक होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून वैमानिक सुरक्षित आहे. रेडबर्ड एव्हिएशन ट्रेनिंग अकादमीचे करण मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला वैमानिक सोलो क्रॉस-कंट्री प्रशिक्षण उड्डाणावर होती. त्यावेळी विमानाचे हार्ड लँडिंग झाले आणि ते धावपट्टीवर अडकले. या विमानाचे नाव ‘टेकनाम पी मेंटर’ असल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा:
संभलमध्ये मशिदीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर
शत्रूला अनपेक्षित धक्का देण्यासाठी सज्ज राहा!
महापौर कार्यालयासह मुंबईतील सहा ठिकाणांना धमकी
यूपीमध्ये दलित-मुस्लिमांच्या मतासाठी ओवैसी-आझाद युती
घटनेनंतर विमानतळावर अग्निशमन दल, वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका आणि सुरक्षा कर्मचारी तातडीने दाखल झाले. फोटोनुसार विमान धावपट्टीवर एका बाजूला तिरपे अडकलेले दिसत आहे. विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी विमानाचे हार्ड लँडिंग नेमके कोणत्या कारणामुळे झाले, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. संबंधित यंत्रणांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे.
