घरविशेषवायुदलाला मिळणार बळकटी! ९७ तेजस मार्क- १ ए लढाऊ विमानं येणार ताफ्यात

वायुदलाला मिळणार बळकटी! ९७ तेजस मार्क- १ ए लढाऊ विमानं येणार ताफ्यात

कराराची किंमत सुमारे ६६,५०० कोटी रुपयांमध्ये असण्याची शक्यता

- Advertisement -

भारतीय वायूदलाची ताकद आणखी वाढणार असून ताफ्यात तेजस विमाने येणार असल्याची माहिती समोर आली आहे. वायुदलाने ९७ तेजस मार्क- १ ए ही लढाऊ विमानं खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हिंदुस्तान एअरोनॉटिकल्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीशी मोठा करार केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कराराची किंमत सुमारे ६६,५०० कोटी रुपयांमध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानांसाठीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करारात, संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्यात ९७ तेजस मार्क- १ ए विमानांसाठीचा करार होणार आहे. येत्या गुरुवारी हा करार केला जाईल. शुक्रवारी ३६ जुनी मिग- २१ विमानं वायूदलाच्या सेवेतून निवृत्त होतील. त्यामुळे वायूदलाच्या ताफ्यातील लढाऊ विमांची संख्या कमी होईल. ही पोकळी भरून काढण्यासाठी भारतीय वायूदलाला नव्या लढाऊ विमानांची गरज भासणार आहे.

या वर्षी १९ ऑगस्ट रोजी, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने अतिरिक्त ९७ तेजस मार्क- १ ए जेट्सच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली, ज्यामुळे या महत्त्वपूर्ण कराराचा मार्ग मोकळा झाला. तसेच तेजस लढाऊ विमानांना शक्ती देणाऱ्या ११३ F- ४०४ इंजिनांच्या पुरवठ्यासाठी जनरल इलेक्ट्रिक (GE) सोबतचा करार देखील अंतिम झाला आहे. तेजस मार्क- १ ए करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर लवकरच इंजिन कराराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा..

२०२५ च्या फेस्टिव्ह सीझनमध्ये किती रोजगार निर्माण होणार बघा..

प्रिया कपूर यांच्या याचिकेवर उद्या दिल्ली हायकोर्टात सुनावणी

वर्ल्ड फूड इंडिया मध्ये एक लाख कोटींचे एमओयू होणार

लडाख हिंसाचार : काँग्रेस नगरसेवकाने जमाव भडकावल्याचा भाजपाचा आरोप!

एअर मार्शल ए. पी. सिंह यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, भारतीय वायूदल लढाऊ विमानांच्या बाबतीत कमकुवत स्थितीत आहे. भारतीय वायूदलाला दर वर्षी ४० नव्या लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. याआधी फेब्रुवारी २०२१ मध्ये ८३ तेजस मार्क- १ ए विमानांच्या खरेदीचा व्यवहार झाला होता. एचएएलला फेब्रुवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२८ दरम्यान या विमानांची डिलीव्हरी करायची आहे. एचएएलने दावा केला आहे की, या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत दोन तेजस विमानं भारतीय वायूदलाकडे सुपूर्द केली जातील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version