घरक्राईमनामागणेशोत्सवाच्या बंदोबस्तात पोलिस अधिकाऱ्याची हत्या

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात पोलिस अधिकाऱ्याची हत्या

चितळसरच्या पीएसआयवर मागून हल्ला

- Advertisement -

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी रात्री गस्तीवर असलेल्या चितळसर पोलिस ठाण्यातील ५६ वर्षीय पोलिस उपनिरीक्षकाची दगड आणि बांबूच्या काठीने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री पोखरण रोड क्रमांक दोन परिसरात घडली. किसान भोईर असे मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी चितळसर पोलिसांनी राजू वाल्मिकी (३०) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

गणेशोत्सवानिमित्त ठाणे शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भोईर हे गुरुवारी रात्री गणवेशात आपल्या पथकासह पीसीआर-१ वाहनातून गस्तीवर होते. गांधीनगर आणि सुभाषनगर परिसरात गस्त घालत असताना पोखरण रोड क्रमांक दोनजवळ त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला.

हे ही वाचा:

भारताच्या परकीय चलनसाठ्यात मोठी घट

मुंबईत आज बाप्पाला निरोप

ज्ञानेशकुमार, २४ तासात राजीनामा द्या, नाहीतर २ ऑक्टोबरपासून आंदोलन

ज्ञानेश कुमारांच्या अडचणीत वाढ

पोलिसांच्या माहितीनुसार, राजू वाल्मिकी याने मागून भोईर यांच्या डोक्यावर बांबूची काठी आणि दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात भोईर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव

कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्याची माहिती मिळताच ठाणे पोलिस दलात खळबळ उडाली. पोलिस उपायुक्त प्रशांत कदम आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हल्ल्यामागील नेमका हेतू तसेच घटनेचा घटनाक्रम याचा तपास चितळसर पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी संशयित आरोपी राजू वाल्मिकी याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीची चौकशी केल्यानंतर हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version