घरबिजनेसरशियन तेल खरेदीत भारताचा नवा विक्रम

रशियन तेल खरेदीत भारताचा नवा विक्रम

जूनमध्ये आयात ३४% वाढली

जागतिक भू-राजकीय तणाव आणि ऊर्जा सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जून २०२६ मध्ये भारताची रशियन कच्च्या तेलाची आयात मे महिन्याच्या तुलनेत तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली, त्यामुळे भारत रशियन तेलाचा चीननंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खरेदीदार ठरला आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (CREA) च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

अहवालानुसार, जूनमध्ये भारताने रशियाकडून सुमारे ४.५ अब्ज युरो किमतीचे कच्चे तेल आयात केले. रशियाकडून झालेल्या एकूण ५.५ अब्ज युरोच्या जीवाश्म इंधन आयातीत ८३ टक्के वाटा कच्च्या तेलाचा होता. याच काळात भारताची एकूण कच्च्या तेलाची आयातही ५.४ टक्क्यांनी वाढली, ज्यामध्ये देशातील प्रमुख रिफायनऱ्यांनी रशियन तेलाच्या खरेदीत मोठी वाढ केली.
हे ही वाचा:
अर्जेंटिना उपांत्य फेरीत; स्वित्झर्लंडवर ३-१ विजय

मोशीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकून ९ मृत्यू, बचावकार्य संपले

‘ताज’ हॉटेलला बॉम्बची धमकी; मध्यरात्री सुरक्षा यंत्रणांची धावपळ

व्हिएतनाममध्ये १५ भारतीय पर्यटकांच्या मृत्यूशी लाव्हा मोबाईलचा काय संबंध?

भारतातील अग्रगण्य रिफायनऱ्यांनी रशियन तेलाच्या खरेदीत मोठी झेप घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरीत रशियन तेलाचा पुरवठा १५० टक्क्यांनी, इंडियन ऑइलच्या पारादीप रिफायनरीत १२६ टक्क्यांनी, बीपीसीएलच्या कोची रिफायनरीत ८३ टक्क्यांनी, तर नायरा एनर्जीच्या वडिनार रिफायनरीत ४५ टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारताच्या वाढत्या मागणीमुळे जूनमध्ये रशियाच्या कच्च्या तेलाच्या निर्यातीत १४ टक्क्यांची वाढ झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने रशियाचे दैनंदिन तेल उत्पन्न ८ टक्क्यांनी घटून ३४८ दशलक्ष युरो इतके राहिले.

विशेष म्हणजे, भारत केवळ रशियन कच्चे तेल आयात करत नाही, तर त्याचे शुद्धीकरण करून पेट्रोलियम उत्पादने विविध देशांना निर्यातही करत आहे. भारतासह तुर्किये, ब्रुनेई आणि जॉर्जिया येथील रिफायनऱ्यांनी रशियन कच्च्या तेलापासून तयार झालेली उत्पादने युरोपियन युनियन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांनाही निर्यात केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version