घरक्राईमनामागोवंडीत गॅस वितरण कर्मचारी विकत होता चढ्या दराने सिलिंडर

गोवंडीत गॅस वितरण कर्मचारी विकत होता चढ्या दराने सिलिंडर

व्यवसायिक गॅस सिलेंडरचा काळा बाजार

घरगुती व व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात अन्न व नागरी पुरवठा विभागाने कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, वरळीतील मोठ्या साठ्यानंतर आता गोवंडी परिसरातही अशीच कारवाई करण्यात आली आहे. चढ्या दराने गॅस सिलिंडर विक्री केल्याप्रकरणी एका गॅस वितरण कर्मचाऱ्याविरुद्ध देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरनुसार, एलपीजी डिलिव्हरीमध्ये सहभागी असलेल्या मोहम्मद फारूख शेख याने एका गॅस एजन्सीकडून प्रत्येकी ३,१०० रुपयांना सिलिंडर खरेदी करून ते परिसरातील हॉटेल मालकांना ३,३०० रुपयांना विकले. यामधून त्याने बेकायदेशीर नफा मिळवल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा:

३ महिन्यांनंतर सॅमसनने खाल्ले आवडते जेवण

सलमानच्या “बॅटल ऑफ गलवान”चे नाव बदलून “मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस”

बीसीसीआय ‘नमन’ अवॉर्ड्समध्ये द्रविड, बिन्नी यांचा सन्मान

घरच्या मैदानात न्यूझीलंडची लाजिरवाणी हार

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी तीन सिलिंडर जप्त केले असून त्यामध्ये २१ किलो वजनाचा एक भरलेला सिलिंडर आणि १९ किलो वजनाचे दोन रिकामे सिलिंडर यांचा समावेश आहे. तसेच सिलिंडर साठवणूक व वाहतुकीसाठी वापरला जाणारा बंद चारचाकी टेम्पोही जप्त करण्यात आला.

गोवंडी रेशनिंग कार्यालयातील अधिकारी जगन्नाथ भानुदास सानप (वय ५६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ मधील कलम ३, ७ व ८ तसेच द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (पुरवठा व वितरण नियमन) आदेश, २००० अंतर्गत तरतुदी लागू करण्यात आल्या असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version