घरक्राईमनामामहिला पोलिस आणि मुलगी घरी मृतावस्थेत; पतीचा मृतदेह झाडावर

महिला पोलिस आणि मुलगी घरी मृतावस्थेत; पतीचा मृतदेह झाडावर

बुलढाण्यातील खळबळजनक घटना

बुलढाणा जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या एक महिला पोलिस आणि तिच्या तीन वर्षांची मुलगी घरात मृतावस्थेत आढळली आहे. तसेच, या महिलेच्या पतीचा मृतदेह घरापासून १५ किमी अंतरावर असलेल्या झाडावर लटकताना आढळला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

बुलढाणा जिल्ह्यात एक महिला पोलिस अधिकारी आणि तिची मुलगी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. महिलेच्या पतीचा मृतदेह घरापासून १५ किलोमीटर अंतरावर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आरोपी पतीने पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा कुटे आणि तिची तीन वर्षांची मुलगी ही चिखली शहरातील पंचमुखी महादेव मंदिराजवळील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली.

 

हे ही वाचा:

उत्तर सापडले; म्हणून रजनीकांत योगी आदित्यनाथांचे पाया पडले

सेवा नाहीत; मग कामगार रुग्णालयाच्या उद्घाटनाचा घाट कशाला?

अभिनेते सनी देओल म्हणतात, आता निवडणूक लढणार नाही!

आठ कोटीच्या चिंधी घोटाळ्याचे धागेदोरेही कलानगरकडे बोट दाखवतायत…

प्राथमिक तपासात किशोर कुटे या महिलेच्या पतीनेच पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने चिखली शहरापासून सुमारे १५ किलोमीटरचा प्रवास करून झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, ही घटना घडली तेव्हा त्यांची आठ वर्षांची दुसरी मुलगी शाळेत होती, त्यामुळे ती या भीषण घटनेतून बचावली.

 

 

चिखली पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हे भयंकर कृत्य त्याने का केले असावे, याचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेबाबत स्थानिकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. किशोर आणि वर्षा या जोडप्यामध्ये चांगले संबंध होते, असे शेजारचे सांगत असल्याने या हत्येमागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version