घरदेश दुनियाअरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग

अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग

चीनच्या आक्षेपांना भारताचे स्पष्ट प्रत्युत्तर

अरुणाचल प्रदेशवर चीनने पुन्हा एकदा आक्षेप घेतल्यानंतर भारताने चीनला स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि चीनने कितीही दावे केले किंवा या भागातील ठिकाणांची नावे बदलली, तरी त्याने वास्तव बदलणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी चीनच्या ताज्या आक्षेपांवर भारताची भूमिका मांडली. चीनकडून अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांना चिनी नावे देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. मात्र, केवळ एखाद्या ठिकाणाचे नाव बदलल्याने त्या भागावरील देशाचे सार्वभौमत्व बदलत नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. अरुणाचल प्रदेशावर भारताचे प्रशासन असून हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याची भूमिका भारताने पुन्हा एकदा ठामपणे मांडली.
हे ही वाचा:
इस वक्त वो कौन कुत्ते है… 

श्रीलंकेविरुद्ध कोहलीचा ‘विराट’ विक्रम!

राहुल गांधींच्या त्या विदेश दौऱ्यात कोण होते सोबत ? फोटो केला व्हायरल

ब्रिटिश स्पाय ड्रोनमधून चीनला सिग्नल? सुरक्षा तपासणीत धक्कादायक कनेक्शन उघड

चीन अरुणाचल प्रदेशला ‘झांगनान’ म्हणजेच ‘दक्षिण तिबेट’ असे संबोधतो आणि या प्रदेशावर आपला दावा असल्याचे सांगतो. चीनने यापूर्वीही अरुणाचलमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याच्या याद्या जाहीर केल्या आहेत. २०१७ मध्ये सहा ठिकाणांची, २०२१ मध्ये १५ ठिकाणांची आणि २०२३ मध्ये आणखी ११ ठिकाणांची नावे चीनने जाहीर केली होती. भारताने प्रत्येक वेळी हे दावे फेटाळून लावले आहेत.

भारताने अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणांची अधिकृत नावे प्रमाणित केली आहेत. या ठिकाणांमध्ये ऐतिहासिक आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांचाही समावेश आहे. लोंग जू येथे १९५९ मध्ये भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला होता, तर थाग ला परिसराचा १९६२च्या भारत-चीन युद्धाशी संबंध आहे. जसवंतगडसारखी ठिकाणे भारतीय सैनिकांच्या शौर्याची आठवण करून देतात.

अरुणाचल प्रदेशचा मुद्दा भारत आणि चीनमधील सीमावादातील अत्यंत संवेदनशील विषय आहे. चीनकडून या प्रदेशावर वारंवार दावे केले जात असले, तरी भारताने आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. चीनने नावे बदलली, नकाशे बदलण्याचा प्रयत्न केला किंवा नवे दावे केले, तरी अरुणाचल प्रदेश भारताचाच भाग राहणार, असा स्पष्ट संदेश भारताने दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version