घरदेश दुनिया२४ भारतीय असलेल्या गॅस जहाजावर इराणचा मिसाईल हल्ला

२४ भारतीय असलेल्या गॅस जहाजावर इराणचा मिसाईल हल्ला

२४ तासांत चार तेलवाहू जहाजांचे नुकसान

गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर आखाती प्रदेशातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या होर्मुज खाडीत पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही तासांत येथे तेल आणि गॅस वाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ले झाल्याने जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, १६ नोव्हेंबर रोजी पनामाचा झेंडा असलेल्या ‘तारा गॅस’ या एलपीजी वाहक जहाजावर मिसाईल हल्ला करण्यात आला. या जहाजावर २४ भारतीयांसह एकूण २५ क्रू मेंबर्स होते, सुदैवाने सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

होर्मुज खाडीतून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जात असल्याचे सांगितले जात असतानाच, इराणकडून झालेल्या या हल्ल्याने भारताला मोठा धक्का दिला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी तातडीने प्रतिक्रिया दिली आहे. “भारत सरकार संपूर्ण परिस्थितीवर बारीक नजर ठेवून असून, भारतीय नाविकांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची आहे,” असे सोनोवाल यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

सोनू सूदने अभिनेता शरद कपूरला दिला मदतीचा हात

‘आम आदमी’चा शिशमहल आता आम जनतेसाठी खुला

भारत-आसियान देशांचे संबंध स्थैर्यासाठी महत्त्वाचे

दहशतवादविरोधी कारवायांसाठी ‘फोर्स वन’ एटीएसच्या नियंत्रणाखाली

गेल्या २४ तासांत किमान चार तेलवाहू जहाजांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. इराणी नौदलाने सांगितले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील भागात नौदल सुरुंगाला धडकल्यानंतर चौथ्या तेलवाहू जहाजाला आग लागली. इराणी नौदलाचा आरोप आहे की, हे जहाज आपली नेव्हिगेशन प्रणाली बंद ठेवून प्रतिबंधित सागरी क्षेत्रातून प्रवास करत होते.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version