घरराजकारणउपोषण सोडून जरांगेंची मुंबई दौऱ्यातून माघार

उपोषण सोडून जरांगेंची मुंबई दौऱ्यातून माघार

सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर निर्णय

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले उपोषण अखेर मागे घेतले आहे. २० दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर आणि सरकारकडून काही मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण सोडल्याचे वृत्त आहे.

सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मनोज जरांगेंनी ९० दिवसांसाठी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच उपोषण स्थगित केले असून मात्र आंदोलन सुरुच राहणार, असे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला ९० दिवसांची मुदत दिली आहे. जीआर काढून गॅझेटियरची अंमलबजावणी करावी आणि ५८ लाख नोंदींमधील एकही नोंद कमी करणार नाही, याची लेखी हमी द्यावी, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. तसेच सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. यासोबतच मुंबईत गेलेल्या समर्थकांनी माघारी यावे असे आवाहन मनोज जरांगेंनी केले आहे.

उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलग २० दिवस उपोषण केल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

“दहशतवादी गुहेत लपून नव्हते, सुरक्षित वातावरणात होते”

सौदी अरेबियाचे F-15 लढाऊ विमान पाडल्याचा हौथींचा दावा

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

‘सेबी’च्या पूर्णवेळ सदस्यपदी कमलेश चंद्र वार्ष्णेय यांची पुनर्नियुक्ती

मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केल्याचा आनंद असल्याच्या भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या. “जरांगेंच्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्या मान्य केल्या होत्या. एका मागणीबाबत त्यांना कायदेशीर अडचणी सांगितल्या होत्या. त्यामुळे ज्या मागण्या मान्य केल्या आहेत, समितीने जी काही आश्वसने दिली आहेत, ती सर्व पूर्ण करु,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे ते म्हणाले की, “सरकार नेहमीच सकारात्मक राहिले आहे. मराठा समाजासाठी मी आणि एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतले, तेवढे निर्णय कधीच कोणी घेतले नाही. मराठा समाजाला जे काही मिळाले, ते आमच्या काळात मिळालेले आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version