घरराजकारणपक्ष फोडणाऱ्यांच्या चरणाशी जाणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणे

पक्ष फोडणाऱ्यांच्या चरणाशी जाणे म्हणजे स्वाभिमान गहाण ठेवणे

डिलिमिटेशन विधेयकाच्या समर्थनावरून राऊत शरद पवारांवर संतापले

ज्या भाजपने शरद पवारांचा पक्ष फोडला, त्यांचे कुटुंब फोडले, त्याच पक्षाच्या नेत्यांच्या चरणाशी जाणार असाल, तर हा स्वाभिमान गहाण ठेवण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला. केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवरून त्यांनी पवार गटाला लक्ष्य केले.

संजय राऊत म्हणाले की, पवार गटाने खरोखरच या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो त्यांच्या विचारधारेसाठी आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी दुर्दैवी आहे. फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेणाऱ्या पक्षांनी अशा भूमिकेचा पुनर्विचार करावा. महाविकास आघाडीच्या माध्यमातून पवार गटाचे आठ खासदार निवडून आले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचाही वाटा आहे. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा न करता सरकारच्या बाजूने भूमिका घेणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांनी पुढे भाजपवर पक्षफोडीचे राजकारण केल्याचा आरोप केला. शरद पवार यांना महाविकास आघाडीने राज्यसभेवर पाठवण्यासाठी पाठिंबा दिला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. पवारांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या विचारधारेचे जतन करण्याची जबाबदारी पार पाडली नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करणाऱ्या खासदारांना १५० कोटी रुपयांचे आमिष दाखवले जात असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला.

हे ही वाचा : 

गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

पवारांचा इतिहास पाठीत खंजीर खुपसणारा!

जैश संबंधित संशयिताला दिल्लीतून अटक

इटलीच्या शाळांमध्ये बुरखा, निकाबवर बंदी!

दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसून ते सध्या रुग्णालयात आहेत. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला पवारांची संमती आहे का, हे स्पष्ट झाले पाहिजे, असे राऊत म्हणाले. पक्ष फुटण्याच्या भीतीपेक्षा देश, महाराष्ट्र आणि विचारधारा महत्त्वाची असल्याचे सांगत, या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version