“लोकशाही दुरुस्त” करण्याची मागणी करण्यापूर्वी काँग्रेसशासित हिमाचल प्रदेशमधील कारभार आणि प्रशासनाची स्थिती सुधारावी, अशा शब्दांत गायिका सोना मोहापात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सोना मोहापात्रा यांनी तब्बल नऊ वर्षांनंतर हिमाचल प्रदेशला भेट दिल्यानंतर तेथील परिस्थिती पाहून धक्का बसल्याचे सांगितले. डोंगरांवर मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा आणि प्रदूषणामुळे गुदमरणाऱ्या नद्यांची अवस्था पाहून आपण हैराण झाल्याचे त्यांनी म्हटले.
सोना मोहापात्रा यांनी ‘एक्स’वर राहुल गांधी यांना टॅग करत हिमाचल प्रदेशला सुशासनाचा आदर्श बनवण्याचे आवाहन केले. राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मोदी सरकारविरोधात केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली.
त्यांनी लिहिले आहे की, “प्रिय राहुल गांधीजी, लोकशाही दुरुस्त करण्यापूर्वी तुम्ही हिमाचल प्रदेश दुरुस्त करण्यापासून सुरुवात करू शकता का? नऊ वर्षांनंतर मी हिमाचल प्रदेशात परतले आणि कचऱ्याने भरलेले डोंगर तसेच गुदमरलेल्या नद्यांची अवस्था पाहून मला धक्का बसला. काँग्रेसच्या सत्तेतील या राज्याला सुशासनाचे आदर्श राज्य बनवा. केवळ जनतेच्या मतांची मागणी करू नका, तर ते मिळवण्याची पात्रता सिद्ध करा.”
हे ही वाचा:
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये
साखरेची मागणी वाढली, दरातही वाढ
बॅलेटवरही काँग्रेसचा सूपडा साफ झाला… २०२९ मध्येही हरायला तयार व्हा!
गुहागर येथे ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभा राहणार?
सोना मोहापात्रा यांच्या पोस्टची पार्श्वभूमी राहुल गांधी यांच्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्रातील मोदी सरकारविषयीच्या वक्तव्याशी संबंधित आहे. राहुल गांधी यांनी ‘एक्स’वरील एका हिंदी पोस्टमध्ये म्हटले होते की, “ज्ञानेश कुमार जातील. हे सरकार जाईल. त्यानंतर लोकशाही दुरुस्त करण्याची सुरुवात होईल.”
सोना मोहापात्रा यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटल्या. काही युजर्सनी काँग्रेसशासित राज्यांनी चांगल्या प्रशासनाचा आदर्श निर्माण करायला हवा, असे मत व्यक्त केले. एका युजरने राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसशासित राज्यांना विकासाचे मॉडेल बनवण्याची संधी असल्याचे म्हटले. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या राज्यांना आदर्श बनवून राहुल गांधी यांनी आपण चांगला पर्याय असल्याचे सिद्ध करावे, अशी प्रतिक्रिया या युजरने दिली.
दुसऱ्या एका युजरने राहुल गांधी यांच्या प्रशासनाच्या दृष्टिकोनावर टीका करत काँग्रेसशासित राज्यांमध्ये भ्रष्टाचार, खराब शिक्षण आणि आरोग्यव्यवस्था तसेच जनतेच्या अडचणी कायम असल्याचा आरोप केला.
