घरस्पोर्ट्सफटकेबाजीचे 'वैभव', विश्वचषक अंतिम सामन्यात ठोकले ३० षटकार-चौकार

फटकेबाजीचे ‘वैभव’, विश्वचषक अंतिम सामन्यात ठोकले ३० षटकार-चौकार

वैभव सूर्यवंशीने केली १७५ धावांची खेळी

विराट कोहली, युवराज सिंग, शिखर धवन, ईशान किशन यासारखे नामांकित खेळाडू जे करू शकले नाहीत, ते १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने करून दाखवले. हरारे येथे खेळल्या जात असलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध अशी खेळी केली की संपूर्ण क्रिकेट विश्वच थक्क झाले. वैभवने षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडत ऐतिहासिक विक्रमही आपल्या नावावर केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो वैभवने योग्य ठरवून दाखविला.

इंग्लंडविरुद्धच्या या अंतिम लढतीत वैभव सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. त्याने केवळ ५५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत या विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वात जलद शतकाचा विक्रम रचला. या खेळीत त्याने ८ उंचच उंच षटकार आणि ८ अप्रतिम चौकार लगावले, ज्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांची लयच बिघडली. या स्पर्धेत एका आवृत्तीत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होण्याचा मानही वैभवने मिळवला. शतकानंतरही तो थांबला नाही आणि पुढील २५ चेंडूंमध्ये त्याने तब्बल ७५ धावा ठोकल्या. १७५ धावांवर तो बाद झाला पण तोपर्यंत त्याने १५ षटकार आणि १५ चौकार मारले होते. विशेष म्हणजे, १७५ धावांपैकी केवळ २५ धावाच त्याने धावून काढलेल्या होत्या.

हे ही वाचा:

आरबीआयचे दर जैसे थे

ट्रॉफी कोण उचलणार? डब्ल्यूपीएल फायनलमध्ये दिल्ली–आरसीबी आमनेसामने

पाकिस्तान सीमेवर पुन्हा गरजणार भारतीय हवाईदल

सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त

१९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकातील वेगवान शतके

५१ चेंडू – विल मलायचुक (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध जपान, विंडहूक, २०२६ 
५५ चेंडू – वैभव सूर्यवंशी (भारत) विरुद्ध इंग्लंड, हरारे, २०२६ 
६३ चेंडू – कासिम अक्रम (पाकिस्तान) विरुद्ध श्रीलंका, नॉर्थ साउंड, २०२२
६५ चेंडू – बेन मेयेस (इंग्लंड) विरुद्ध स्कॉटलंड, हरारे, २०२६
६९ चेंडू – राज बावा (भारत) विरुद्ध युगांडा, टारुबा, २०२२

सूर्यवंशीने आपली खेळी ८० चेंडूंमध्ये १७५ धावांवर समाप्त केली. या खेळीत त्याने १५ चौकार आणि १५ षटकार लगावले.
१९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात १५० धावा करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला.

राज बावा यांचा विक्रम मोडण्याबरोबरच, सूर्यवंशीने १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा दक्षिण आफ्रिकेच्या ड्युवाल्ड ब्रेव्हिसचा विक्रमही मोडला.या स्पर्धेत सूर्यवंशीने एकूण ३० षटकार ठोकले, ज्यामुळे २०२२ मधील ब्रेव्हिसचे १८ षटकारांचा विक्रम मागे पडला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version