घरविशेषबिहारमध्ये वीज कोसळून ३३ लोकांचा मृत्यू

बिहारमध्ये वीज कोसळून ३३ लोकांचा मृत्यू

- Advertisement -

बिहारमध्ये वादळी पावसाने कहर केला असून राज्यात मोठी वित्तहानी आणि जीवितहानी झाली आहे. बिहारमधील १६ जिल्ह्यांमधील ३३ लोकांचा वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. तसेच राज्यात युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.

बिहारमध्ये वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून वादळामुळे आंबा, लिची, मका, मूग, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान वीज पडून दुर्दैवाने तब्बल ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच नितीश कुमार यांनी लोकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे.

बिहारमध्ये वादळामुळे भागलपूरमध्ये सात, मुझफ्फरपूरमध्ये सहा, सारणमध्ये तीन, लखीसरायमध्ये तीन, मुंगेरमध्ये दोन, नालंदा, पूर्णिया, जेहानाबाद, समस्तीपूर, खगरिया, बांका, अररिया, बेगुसराय, जमुई, कटिहारमध्ये दोन तर दरभंगामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध

शिवलिंगाबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर प्राध्यापकाला अटक

२०२० चे प्रकरण उकरून काढत, केतकी चितळेंवर कारवाई

मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ३३ लोकांचा मृत्यू झालेल्या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत घटनेचा शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव कार्य सुरू असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version