घरबिजनेसकेंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

सप्टेंबरचा पगार २५ लाच खात्यात

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचा पगार आणि पेन्शन यावेळी नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर मिळणार असून, २५ सप्टेंबर २०२६ रोजीच संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशभरात २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रस्तावित तीन दिवसीय बँक संपाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. महिन्याच्या अखेरीस बँकिंग व्यवहार ठप्प झाल्यास पगार आणि पेन्शनच्या वितरणावर परिणाम होऊ नये, तसेच कर्मचारी आणि पेन्शनधारकांची आर्थिक गैरसोय टाळता यावी, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला असून, केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये संरक्षण, टपाल आणि दूरसंचार विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील औद्योगिक कर्मचाऱ्यांचे वेतनही २५ सप्टेंबरलाच देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पेन्शनधारकांची सप्टेंबर महिन्याची पेन्शनही संबंधित बँका आणि वेतन-लेखा कार्यालयांमार्फत याच दिवशी जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
५०० कोटींच्या मानहानी नोटिशीला आदित्य ठाकरेंचे उत्तर

कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करण्याची घोषणा

सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा

भारताच्या अर्थव्यवस्थेला जागतिक संस्थांचा विश्वास

सामान्यतः सरकारी कर्मचाऱ्यांना महिन्याच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशी वेतन मिळते. मात्र यंदा सप्टेंबरच्या अखेरीस सलग तीन दिवस बँक संप प्रस्तावित असल्याने व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेतन वितरणात विलंब होऊ नये म्हणून सरकारने काही दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारी ही रक्कम अतिरिक्त पगार किंवा बोनस नसून, सप्टेंबर महिन्याचे नियमित वेतनच आगाऊ स्वरूपात देण्यात येणार आहे.

आगाऊ वेतन देताना अंतिम गणनेत काही फरक किंवा आर्थिक समायोजन निर्माण झाल्यास त्याचा हिशोब ऑक्टोबर २०२६च्या वेतनात करण्यात येणार आहे. त्यामुळे २५ सप्टेंबरला पगार मिळाल्याने वेतनाच्या अंतिम रकमेत कोणताही अतिरिक्त लाभ मिळणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. बँक संपामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी सरकारने आधीच ही व्यवस्था केल्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महिनाअखेरीस मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version