घरविशेषकाश्मीर फाईल्स प्रत्येक भारतीयाने पाहावा - आमिर खान

काश्मीर फाईल्स प्रत्येक भारतीयाने पाहावा – आमिर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेते आमिर खान याने काश्मीर फाईल्स चित्रपटाची स्तुती केली आहे. मी हा चित्रपट बघणार असून हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने बघितला पाहिजे असे आमिरने म्हटले आहे. रविवार, २० मार्च येथे आमिरने या संदर्भात भाष्य केले आहे. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रविवार, २० मार्च रोजी अभिनेता आमिर खान हा दिल्ली येथे आर आर आर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी आर आर आर चित्रपटाची अभिनेत्री आलिया भट ही देखील उपस्थित होती. या प्रसंगी अयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमिर खानला द काश्मीर फाईल्स चित्रपटा बाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना आमिर म्हणतो.

हे ही वाचा:

‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र लाभ घेते पवार सरकार’

लक्ष सेन स्पर्धा हरला, पण मने जिंकून गेला

काश्मीर फाईल्सच्या टीमने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ येतोय!

मी हा चित्रपट नक्की बघेन. हा आपल्या इतिहासातील असा एक भाग आहे ज्याबद्दल हृदय तुटते. जे काश्मिरी पंडितांच्या बाबतीत घडले ती एक दुःखद बाब आहे. हा चित्रपट त्याच कथेवर बनला आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने हा चित्रपट पाहायला हवा.

पुढे आमिर खान असेही म्हणाला की, “या चित्रपटाने त्या सर्व नागरिकांना भावनिक स्पर्श केला आहे ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे. हे या चित्रपटाचे सौंदर्य आहे. मी हा चित्रपट नक्कीच बघणार आहे आणि हा चित्रपट यशस्वी ठरल्याचे बघून मला आनंद होत आहे.”

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version