घरविशेषमुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाजवली भोजपुरी गाणी

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाजवली भोजपुरी गाणी

प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी

दिवाळी आणि भाऊबीजेचा सण साजरा होत असतानाच मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. छटपूजेच्या पार्श्वभूमीवर ही गाणी वाजवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, रेल्वे स्थानकांवरील नियमित उद्घोषणांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. यासोबतच पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

वडाळा, सानपाडा, आंबिवली, ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांसह अनेक रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवण्यात आल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. छटपूजेसाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, रेल्वे स्थानकांवर गाणी वाजवण्याच्या निर्णयावर काही प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच राजकीय वादालाही तोंड फुटले आहे.

हे ही वाचा:

अभिषेक बॅनर्जींच्या घराबाहेरील अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई

कुराणातील आयत कोरलेल्या करीना कपूर खानच्या पेंडंटवर काँग्रेसचा संताप

छेडछाडीला विरोध करणाऱ्या तरुणीला लोकलमधून ढकलले

किश्तवाडमध्ये ड्युटीवरून बेपत्ता झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची हत्या

दरम्यान, या प्रकरणावर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी स्पष्टीकरण दिले आहे. छटपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही गाणी वाजवण्यात आली होती. ज्या रेल्वे स्थानकांवरून छटपूजेसाठी विशेष गाड्या धावतात, त्या स्थानकांवर हा उपक्रम राबवण्यात आला. यामागे भोजपुरी भाषेला महत्त्व देण्याचा उद्देश नसून छटपूजेच्या सणाचे महत्त्व अधोरेखित करणे हा हेतू होता, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version