जीएमबीएफ ग्लोबल या दुबईतील आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नेट वर्किंग संस्थेमार्फत ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी दुबईत होणाऱ्या महाबीझ २०२६ या आंतरराष्ट्रीय उद्योजक परिषदेत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त व्यावसायिक आणि उद्योजकांनी सहभागी होऊन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन या संस्थेचे मीडिया सचिव दिलीप खेडेकर यांनी केले आहे. ही नववी परिषद आहे.
जीएमबीएफ ग्लोबल ही संस्था गेल्या २० वर्षांपासून दुबईत कार्यरत आहे. या संस्थेच्या कमिटीतील १४ सदस्यांचा स्वतःचा व्यवसाय असून महाराष्ट्रातील उद्योजकांना मार्गदर्शन आणि शक्य असेल ती मदत करण्यास सदस्य नेहमी तत्पर असतात आणि यासाठी ही संस्था कोणतेही मूल्य आकारात नाही.
२०१०मध्ये पहिली महाबिझ परिषद दुबईत भरली. दुबईतल्या १०-१२ मित्रांनी एकत्र येऊन दुबईतील गुंतवणुकीसाठी एखादे व्यासपीठ तयार करता येईल का याचा विचार केला आणि त्यातून ही संकल्पना पुढे आली, खेडेकर यांनी ही माहिती दिली.
हे ही वाचा:
भारताची अर्थव्यवस्था पुन्हा वेगात
उद्धव ठाकरेंशी केलेल्या युतीचा राज यांना सर्वात मोठा फटका
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अमेरिकेशी केला ६० वेळा संपर्क
अमेरिका–चीन तणाव वाढला, व्हेनेझुएलावरून वाद
ते म्हणाले, २०१४ मध्ये गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे १०० सदस्य झाले. आज ही संख्या ५०० आहे. या परिषदेला आता १४-१५ देशांतील उद्योगप्रेमी येतात.
महाबिझ २०२६ (MahaBiz 2026) हे स्थानिक उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ असेल. महाराष्ट्र, मध्यपूर्वेतील देश आणि आफ्रिकेला जोडणाऱ्या शक्तिशाली जागतिक नेटवर्कद्वारे स्थानिक उद्योजक आणि व्यवसायांना निर्यात, आयात, संयुक्त उपक्रम (Joint Ventures), निधी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यासाठी या प्रभावी उपक्रमाचा लाभ होऊ शकेल. यूएई, मध्यपूर्वेतील देश आणि अफ्रिकन देशातील विविध व्यवसाय आणि उद्योगतील संधीची माहिती या परिषदेत मिळू शकेल.
गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल (GMBF Global) आणि ‘महाबिझ ‘ सारखी आंतरराष्ट्रीय व्यासपीठं महाराष्ट्रातील उद्योजकांना जागतिक बाजारपेठांशी जोडण्याचं प्रभावी माध्यम आहे. योग्य नेटवर्क, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध झाल्यास स्थानिक उद्योगही आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होऊ शकतात.
आजच्या काळात व्यवसायासाठी भौगोलिक सीमा ओलांडण्याचा विचार करण्याची गरज आहे. स्थानिक चौकटीबाहेर पडून जागतिक संधी शोधल्या तर महाराष्ट्राच्या अनेक शहरांतील उद्योजकही आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करू शकतात. आणि GMBF Global’ आणि ‘MahaBiz ‘ सारखी व्यासपीठं उद्योजकांना तो आत्मविश्वास आणि दिशा देतात.
ज्या उद्योजक आणि व्यावसायिकाना आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याची इच्छा आहे त्यांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन जीएमबीएफ च्या वतीने करण्यात आले आहे.
‘गल्फ महाराष्ट्र’च्या या उपक्रमाची जबाबदारी अध्यक्ष सुनील मांजरेकर आणि सरचिटणीस विवेक कोल्हटकर तसेच त्यांच्या टीमने समर्थपणे सांभाळली आहे.
कार्यक्रम :
३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ९, अल हबतूर पोलो रिसॉर्ट मध्ये
नेटवर्किंग मेळावा.
१ फेब्रुवारी रोजी जगप्रसिद्ध ‘अटलांटीस द पाम’ या पंचतारांकित हॉटेल मध्ये जागतिक उद्योजक परिषद. सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत
संपर्क :
दिलीप खेडेकर
Mob. 9920157927
