ॲपलने आपल्या डेव्हलपर वेबसाइटवर सुरू केला नवा विभाग

ॲपलने आपल्या डेव्हलपर वेबसाइटवर सुरू केला नवा विभाग

तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ॲपलने आपल्या डेव्हलपर वेबसाइटवर एक नवा विभाग (Section) सुरू केला आहे, ज्यामध्ये लिक्विड ग्लास डिझाइनसह पुन्हा डिझाइन केलेल्या अ‍ॅप गॅलरीचे प्रदर्शन केले आहे. ॲपलची ही नवी लिक्विड ग्लास डिझाइन लँग्वेज सर्वप्रथम iOS 26 सोबत सप्टेंबर महिन्यात सादर करण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू थर्ड पार्टी डेव्हलपर्सनी ती ॲपलच्या इकोसिस्टममध्ये स्वीकारली. आता या बदलांचे दर्शन घडवण्यासाठी कंपनीने हा नवा विभाग सुरू केला आहे.

कंपनीच्या मते, प्रत्येक आकाराच्या विकासक टीम्स लिक्विड ग्लास आणि नव्या डिझाइनचा वापर करून ॲपल प्लॅटफॉर्मवर अधिक नैसर्गिक आणि प्रतिसादक्षम (responsive) अनुभव तयार करत आहेत. नव्या पेजवर iOS १८ आणि अद्ययावत iOS 26 या दोन्ही आवृत्त्यांतील लोकप्रिय अ‍ॅप्सची बाजूबाजूने तुलना दाखवली आहे, ज्यामुळे डिझाइनमधील सुधारणांचा स्पष्ट अंदाज येतो. कंपनीने गॅलरीमध्ये दाखवलेल्या अ‍ॅप्समध्ये अमेरिकन एअरलाइन्स, टाइड गाइड, लुमी, स्काय गाइड, लीनिअरिटी, LTK, कार्डपॉइंटर्स, ग्रोपाल, लोव्स, क्रम्बल, अ‍ॅसेइस्ट, फोटो रूम, ओम्नीफोकस ४, CNN आणि ल्युसिड मोटर्स यांचा समावेश आहे.

हेही वाचा..

आरएसएस हे संपूर्ण जगातील सर्वात विलक्षण संघटन

मानव तस्करी, मनी लॉन्ड्रिंग रॅकेटचा भंडाफोड

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोला दौर्‍यावर रवाना

ट्रम्प यांची तुंबडी भरो; राजकारणाचा पराभव हा महाराष्ट्राच्या नेत्यांना धडा

दरम्यान, ॲपलने भारतात आपल्या इतिहासातील सर्वाधिक तिमाही शिपमेंटची नोंद केली आहे. सणासुदीचा हंगाम आणि नव्या iPhone १७ Series च्या प्रचंड यशामुळे, कंपनीने २०२५ च्या जुलै–सप्टेंबर तिमाहीदरम्यान भारतात तब्बल ४९ लाख स्मार्टफोन शिप केले. रिसर्च फर्म Omdia च्या आकडेवारीनुसार, ही वार्षिक स्तरावर ४७ टक्क्यांची वाढ दर्शवते. सप्टेंबर तिमाहीत ॲपलच्या जागतिक iPhone शिपमेंटमध्ये भारताचा वाटा ९ टक्के होता — जो आजवरचा सर्वाधिक आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने आपल्या वापरकर्त्यांसाठी iPhone १७ Series सादर केली होती. या सिरीजमध्ये चार फोन लाँच करण्यात आले, ज्यामध्ये नेक्स्ट जनरेशन फीचर्स आणि अत्याधुनिक चिप्सचा समावेश आहे. कंपनीच्या विशेष ऑफरमध्ये iPhone Air मॉडेल होते, ज्याबद्दल ॲपलचा दावा आहे की ते “Pro Power” सह सर्वात स्लिम डिझाइनमध्ये आणले गेले आहे.

Exit mobile version