रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट उत्पादनाला ७,२८० कोटींची मंजुरी

रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट उत्पादनाला ७,२८० कोटींची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ७,२८० कोटी रुपयांच्या वित्तीय तरतुदीसह सिंटर्ड रेअर अर्थ परमनेंट मॅग्नेट (REPM) उत्पादनाला प्रोत्साहन देणाऱ्या योजनेला मंजुरी दिली. या योजनेचे उद्दिष्ट भारतात दरवर्षी ६,००० मेट्रिक टन एकात्मिक आरईपीएम उत्पादन क्षमता उभी करणे आहे, ज्यामुळे आत्मनिर्भर भारत संकल्पनेला गती मिळेल आणि भारत जागतिक आरईपीएम बाजारात एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून उदयास येईल.

रेअर अर्थ परमानेंट मॅग्नेट म्हणजे काय?
सिंटर्ड रेअर अर्थ परमानेंट मॅग्नेट हे सर्वात शक्तिशाली चुंबक असून, निओडिमियम आणि सॅमरियम यांसारख्या दुर्मिळ पृथ्वीतील धातूंच्या मिश्रधातूपासून तयार केले जातात. ‘सिंटरिंग’ ही प्रक्रिया म्हणजे : पावडरीय धातू गरम व संपीडित करून ठोस चुंबक तयार करण्याची तंत्रज्ञान प्रक्रिया. यामध्ये दुर्मिळ मृदा ऑक्साईडचे धातूंमध्ये रूपांतरण, धातूंचे मिश्रधातूंमध्ये रूपांतरण आणि त्यानंतर मिश्रधातूंपासून आरईपीएम उत्पादन

हेही वाचा..

गोडसेंच्या अस्थिच्या विसर्जनाचा मुहूर्त जवळ आलाय?

अबब ! एलपीजीचा खप ४४ टक्क्यांनी वाढला

तीन वर्षांत १ अब्ज ४६ कोटींचे ड्रग्ज जप्त

केंद्राकडून मल्टी-ट्रॅकिंग रेल्वे प्रकल्पांना मंजुरी

कुठे वापर होतो? हे चुंबक अत्यंत महत्त्वाचे आहेत: इलेक्ट्रिक वाहने, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक्स, एरोस्पेस, संरक्षण उपकरणे. सरकारच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रिक वाहने, नवीकरणीय ऊर्जा, औद्योगिक क्षेत्रे आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने भारताची आरईपीएम मागणी २०२५ ते २०३० दरम्यान दुपटीपेक्षा जास्त वाढण्याचा अंदाज आहे. सध्या भारत मुख्यत्वे आयातीवर अवलंबून आहे.

Exit mobile version