सोने-चांदींच्या दराने डोळे दिपले!

गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण

सोने-चांदींच्या दराने डोळे दिपले!

आज २१ जानेवारी २०२६ रोजी देशभरात सोने आणि चांदीच्या दरात भक्कम वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ बाजारासाठी विश्वासवर्धक संकेत मानली जात असून, विशेषतः दीर्घकालीन गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा काळ आशादायी ठरत आहे. मौल्यवान धातूंवरील वाढता विश्वास आणि मजबूत मागणी याचेच हे चित्र असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) कडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात एकाच दिवसात लक्षणीय वाढ पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट सोने (१० ग्रॅम) आज उच्चांकी पातळीवर पोहोचले असून त्याचा दर सुमारे १,५५,००० रुपयांवर आहे. कालच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात ८  हजार रुपयांच्या आसपास वाढ झाली असून, शुद्ध सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून वाढती पसंती मिळत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
हे ही वाचा:
कल्याण- डोंबिवलीत मनसेची एकनाथ शिंदेंना साथ! भाजपाचे काय होणार?

कर्तव्य मार्गावर रचणार इतिहास; काश्मिरी मुलगी करणार सीआरपीएफ पुरुष संघाचे नेतृत्व!

संभल हिंसाचाराचा सूत्रधार शरीकच्या घरावर जप्ती

पाण्याने भरलेल्या खड्ड्यातील अभियंत्याच्या मृत्यु्प्रकरणी बिल्डर अटकेत
याचबरोबर २२ कॅरेट सोने (१० ग्रॅम) आज सुमारे १,४२,००० व्यवहारात आहे. काल म्हणजेच २० जानेवारी २०२६ रोजी हाच दर सुमारे १,३५,००० रुपयांवर होता. म्हणजेच एका दिवसात सोन्याच्या दरात ७,००० पेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ बाजारातील मजबूत मागणी आणि गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास दर्शवते.

फक्त सोनेच नाही, तर चांदीच्या दरातही सकारात्मक हालचाल दिसून आली आहे. आज १ किलो चांदीचा दर ₹३,२०,००० च्या पुढे गेला आहे, तर कालपर्यंत चांदी सुमारे ₹३,०९,००० दराने विकली जात होती. म्हणजेच चांदीच्या किमतीतही ₹१०,००० पेक्षा जास्त वाढ झाली असून, चांदीतील गुंतवणूकही फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे.

बाजार तज्ज्ञांच्या मते, ही दरवाढ जागतिक बाजारातील घडामोडी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चितता, डॉलरमधील चढउतार आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढलेला कल यामुळे झाली आहे. अशा परिस्थितीत सोनं-चांदीकडे वळणं हे बाजारातील स्थैर्याचं आणि विश्वासाचं लक्षण मानलं जातं.

महत्त्वाची बाब म्हणजे, जाहीर केलेले हे दर जीएसटी आणि मेकिंग चार्जेसशिवाय आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष दागिने खरेदी करताना स्थानिक कर व खर्चानुसार दरात बदल होऊ शकतो.

एकूणच, आजचा दिवस सोने-चांदी बाजारासाठी सकारात्मक आणि महत्त्वाचा ठरतो. गुंतवणूकदारांसाठी हा काळ संधीचा असून, दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहता सोनं-चांदी अजूनही भक्कम, सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Exit mobile version