सराफा बाजारात सोन्याला झटका

बाजारातील कमजोरी आणि नफा वसुलीचा परिणाम

सराफा बाजारात सोन्याला झटका

आज १० फेब्रुवारी २०२६ रोजी देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर झालेल्या वाढीनंतर आज गुंतवणूकदारांकडून नफा वसुली सुरू झाल्यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव दिसून येत आहे. जागतिक बाजारातील संकेत, डॉलरची मजबुती आणि अमेरिकेतील आगामी आर्थिक आकडेवारी यांचा थेट परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर आज सोन्याचे दर घसरलेले दिसून आले. जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये घट झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातही त्याचा परिणाम जाणवला. आज २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १,५७,९१० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवण्यात आला आहे. त्याचबरोबर २२ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १४,४७५० रुपये प्रति १० ग्रॅम, तर १८ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ११,८४४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका राहिला आहे. प्रमुख शहरांमधील सरासरी बाजारभावाशी हे दर साधारण जुळणारे आहेत.
हे ही वाचा:
“राजकीय लढाया न्यायालयात लढू नका”

घसरणीनंतर गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी

बांगलादेशातील अल्पसंख्यकांसाठी १५ देशांतील हिंदू एकटवले!

पाकिस्तानने गुडघे टेकले; भारताविरोधात टी-२० वर्ल्डकप सामना खेळणार

चांदीच्या दरांमध्येही आज लक्षणीय घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवरील व्यवहारात चांदीचा दर सुमारे २,५७,५२३ रुपये प्रति दहा ग्रॅम इतका खाली आला आहे. मागील काही सत्रांमध्ये चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती, मात्र आज नफा वसुलीमुळे चांदीवर विक्रीचा दबाव वाढला आहे. औद्योगिक मागणी आणि जागतिक बाजारातील हालचालींमुळे चांदीचे दर सध्या अस्थिर अवस्थेत आहेत.

जागतिक स्तरावर अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक पर्यायांवर दबाव आला आहे. तसेच अमेरिकेत लवकरच जाहीर होणारा महागाई दराचा आकडा आणि रोजगाराशी संबंधित अहवाल याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. या आकडेवारीच्या आधारे पुढील काळात व्याजदर धोरणाबाबत संकेत मिळण्याची शक्यता असल्यामुळे सध्या बाजारात सावध भूमिका घेतली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, जागतिक राजकीय घडामोडी, आर्थिक अनिश्चितता आणि महागाईचा दबाव पाहता दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोनं आणि चांदीची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र अल्पकालीन काळात दरांमध्ये चढ-उतार सुरूच राहतील. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातील हालचाली लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, असा सल्ला दिला जात आहे.

दरम्यान, ग्राहकांसाठी सध्याची घसरण ही खरेदीची संधी ठरू शकते. मात्र सोनं किंवा चांदी खरेदी करताना स्थानिक कर, जीएसटी आणि इतर शुल्कांचा विचार करूनच व्यवहार करावा, असे आर्थिक जाणकार सांगतात.

Exit mobile version