अमेरिकेने भारतावर लावले आणखी २५ टक्के शुल्क; पण भारत झुकेगा नही!

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्ट भूमिका

अमेरिकेने भारतावर लावले आणखी २५ टक्के शुल्क;  पण भारत झुकेगा नही!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या कारणावरून भारतीय निर्यातींवर अतिरिक्त २५% शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे एकूण टॅरिफ ५०% पर्यंत पोहोचला आहे. यावर भारताने आपण कोणत्याही परिस्थितीत झुकणार नसल्याचे म्हटले असून हा निर्णय अन्यायकारक, अयोग्य आणि अमान्य असल्याचे म्हटले आहे.

भारताची ठाम भूमिका:

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, भारताची रशियाकडून तेल खरेदी ही बाजारातील गरजांवर आधारित आहे व १.४ अब्ज भारतीयांच्या ऊर्जा सुरक्षेसाठी ती खरेदी आवश्यक आहे.

मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे, अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. अन्य अनेक देश देखील आपल्या राष्ट्रीय हितासाठी रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. त्यामुळे भारताला लक्ष्य करणे अन्यायकारक आहे.

हे ही वाचा:

जनधन खातेदार ३० सप्टेंबरपर्यंत केवायसी करू शकतात

गुलशन बावरा यांनी हिंदी सिनेमाला दिला अजरामर गीतांचा खजिना

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाविरोधात महाराष्ट्रात एल्गार

डायबिटीजपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत चपातीचे अनेक फायदे जाणून घ्या..

 ट्रम्प यांचा आरोप:

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर रशियन युद्धयंत्राला चालना देण्याचा आरोप केला आहे आणि भारत रशियाकडून तेल खरेदी करून ते खुले बाजारात विकून नफा कमवत आहे, असे म्हणाले.

रशियाचा भारताला पाठिंबा:

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी अमेरिकेच्या दबाव तंत्रावर प्रतिक्रिया देताना म्हटले, रशियासोबत व्यापार संबंध तोडण्यासाठी देशांवर केले जाणारे हे दबाव अयोग्य व बेकायदेशीर आहेत. भारत आपले राष्ट्रीय हित पाहूनच निर्णय घेईल.

भारताने स्पष्ट केले की, आम्ही आमच्या परराष्ट्र धोरणात कोणत्याही दबावामुळे बदल करणार नाही. भारताचे राष्ट्रीय हित सर्वोच्च आहे आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील.

Exit mobile version