भारतात आयोजित करण्यात आलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ (India AI Impact Summit 2026) मध्ये भारतीय एआय स्टार्टअप्सची व्यापक चर्चा झाली. परिषदेत उद्योगतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि गुंतवणूकदारांनी भारत एआय नेतृत्वासाठी पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला. भारतीय भाषांमधील तंत्रज्ञान विकास, स्थानिक गरजांवर आधारित उपाय आणि मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम यामुळे भारत आता जागतिक एआय नकाशावर ठळकपणे दिसू लागला आहे.
साल २०२६ मध्ये भारत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. आतापर्यंत एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारा देश म्हणून ओळख असलेला भारत आता स्वतःची मोठी लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम), एआय प्लॅटफॉर्म्स आणि नाविन्यपूर्ण उपाय विकसित करणारा इनोव्हेटर बनला आहे. आरोग्य, शेती, ग्राहक सेवा, ई-कॉमर्स, उद्योग, शिक्षण आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध क्षेत्रांत भारतीय स्टार्टअप्स जागतिक कंपन्यांना स्पर्धा देत आहेत.
हे ही वाचा:
सात वर्षांपासून फरार ‘बॉबी कबूतर’ अखेर जाळ्यात
‘थँक यू इंडिया’ इमॅन्युएल मॅक्रोन यांचा भावनिक निरोप
ट्रम्पपुढे पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची लाळघोटेपणाची कमाल
भारत- पाकिस्तान सीमेवर लटकवल्यात काचेच्या बाटल्या! काय आहे कारण?
भारतीय भाषांमध्ये सक्षम ‘सोव्हरिन एलएलएम’ विकसित करणारी सर्वम एआय (Sarvam AI) विशेष चर्चेत आहे. Sarvam AI कंपनीने ‘सर्वम काझे’ (Sarvam Kaze) या स्मार्ट ग्लासेसची झलक सादर केली आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम (Krutrim – Ola AI) हे भारतातील पहिले एआय युनिकॉर्न ठरले असून मल्टीलिंग्वल फुल-स्टॅक एआय इकोसिस्टम उभारत आहे.
ग्राहक सेवा आणि कॉल सेंटर ऑटोमेशन क्षेत्रात युनिफोर (Uniphore), यलो डॉट एआय (Yellow.ai) आणि ऑब्झर्व डॉट एआय (Observe.AI) या कंपन्या आघाडीवर आहेत. त्या चॅटबॉट्स, रिअल-टाइम कोचिंग आणि डेटा विश्लेषणाद्वारे उद्योग अधिक कार्यक्षम बनवत आहेत.
आरोग्य क्षेत्रात क्युअर डॉट एआय (Qure.ai) रेडिओलॉजी आणि क्षयरोग निदानात एआयचा वापर करत आहे, तर सिगट्युपल (SigTuple) रक्त व मूत्र तपासणीचे ऑटोमेशन करत आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात वायसा (Wysa) हे एआय चॅटबॉट जगभरातील लाखो लोकांना मदत करत आहे.
ई-कॉमर्स आणि व्हिज्युअल एआयमध्ये मॅड स्ट्रीट डेन (Mad Street Den – Vue.ai) आणि अवतार एआय (Avataar) या कंपन्या ३डी व एआर/व्हीआर तंत्रज्ञानाद्वारे खरेदीचा अनुभव अधिक आकर्षक करत आहेत. शेती आणि हवामान विश्लेषणासाठी सॅटशुअर (SatSure) सॅटेलाइट डेटा वापरत आहे, तर इंटेलो लॅब्स (Intello Labs) फळे व भाज्यांची गुणवत्ता तपासून अन्न वाया जाणे कमी करत आहे.
उद्योगांसाठी आर्या डॉट एआय (Arya.ai) अवामो (Avaamo) आणि हॅप्टिक (Haptik) विविध एआय उपाय उपलब्ध करून देत आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात नेयसा (Neysa) एआय क्लाऊड उभारत आहे. तसेच जेनलूप (GenLoop), बोलना एआय (Bolna AI), न्यूरल गॅरेज (NeuralGarage) आणि स्पाइन (Spyne) या कंपन्याही वेगाने प्रगती करत आहेत.
भारतीय भाषांवर आधारित तंत्रज्ञान, वाढती गुंतवणूक, सरकारी प्रोत्साहन धोरणे आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप संस्कृतीमुळे भारत एआय क्षेत्रात नेतृत्वाच्या दिशेने ठाम पावले टाकत आहे. ही एआय क्रांती भारताला जागतिक तंत्रज्ञान महासत्ता बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
