सन २०२५ हे म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरले आहे. या काळात सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) मधील गुंतवणूक ३ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (एएमएफआय) च्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान गुंतवणूकदारांनी एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये एकूण ३.०४ लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. हा आकडा संपूर्ण २०२४ मध्ये २.६९ लाख कोटी रुपये आणि २०२३ मध्ये १.८४ लाख कोटी रुपये इतका होता. यामध्ये इक्विटी, डेट आणि हायब्रिड म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक समाविष्ट आहे.
इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीचा वाटा सातत्याने वाढत आहे. एएमएफआयच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२५ पर्यंत सक्रिय इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे एकूण २.२७ लाख कोटी रुपये आले असून, हा आकडा मागील संपूर्ण वर्षात २.२० लाख कोटी रुपये इतका होता. ग्रॉस इक्विटी इनफ्लोमध्ये एसआयपीचा वाटा यावर्षी ३७ टक्के झाला आहे, जो मागील वर्षी २७ टक्के होता.
हेही वाचा..
मुंबईतून १८९ बांगलादेशी घुसखोरांचा जन्म दाखला रद्द; चार कर्मचारी निलंबित
मेलबर्न कसोटी इंग्लंडने जिंकली, २०११ नंतरचा पहिला विजय
कंबोडिया- थायलंड तात्काळ युद्धबंदीवर सहमत!
एकूण एसआयपी इनफ्लोपैकी सुमारे ८० टक्के हिस्सा एकट्या सक्रिय इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवला जातो. एसआयपीद्वारे वाढणारी गुंतवणूक हे दर्शवते की भारतीय बाजारात गुंतवणूकदार दीर्घकालीन दृष्टिकोनातून शिस्तबद्ध गुंतवणूक करत आहेत आणि त्यामुळे संपत्ती निर्मितीसही मदत होत आहे. देशातील म्युच्युअल फंड उद्योगाचे एसेट अंडर मॅनेजमेंट (एयूएम) नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढून ८०.८० लाख कोटी रुपये झाले आहे आणि त्यामध्ये एसआयपी एयूएमचा वाटा १६.५३ लाख कोटी रुपये, म्हणजेच सुमारे २० टक्के आहे. मात्र, सन २०२५ मध्ये लंपसम गुंतवणुकीत घट झाल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये ही गुंतवणूक घटून ३.९ लाख कोटी रुपये झाली असून, मागील संपूर्ण वर्षात ती ५.९ लाख कोटी रुपये होती.
