महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस, स्वित्झर्लंड येथे आहेत. तिथे महाराष्ट्रासाठी अधिकाधिक गुंतवणूक आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. तिथे महाराष्ट्राच्या केंद्राचे उद्घाटन करताना फडणवीसांनी आगामी योजनांबद्दल माहिती दिली.
ते म्हणाले की, आम्ही तिसरी मुंबई तयार करत आहोत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकीचा विचार केला जातोय. आंतरराष्ट्रीय निधी भारतात येणार आहे. भारताकडे त्या दृष्टीने पाहिले जात आहे. आम्ही ज्या पायाभूत सुविधा तयार केल्या आहेत. त्यात अटल सेतू, नवी मुंबई विमानतळाचा समावेश होतो. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणावर शहरी विकास होणार आहे.
महाराष्ट्राला इथे चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. शिवाय, अन्य राज्येही इथे आपल्या गुंतवणुकीच्या प्रयत्नांसाठी आली आहेत, त्यांनाही फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या.
गेल्यावर्षी महाराष्ट्रासाठी १५ लाख कोटींची गुंतवणूक आली होती. त्यात यंदा किती भर पडेल हे लवकरच स्पष्ट होईल.
फडणवीस म्हणाले की, ६७५ चौरस किमी जमिनीवर ही तिसरी मुंबई उभी राहणार आहे. त्यात शिक्षणाचे शहर, वैद्यकीय शहर, क्रीडाशहर, जीसीसिटी तयार करू. ठराविक संकल्पनेवर आधारित असे हे शहर असेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येईल शिवाय, मोठ्या प्रमाणावर नोकऱ्याही उपलब्ध होतील.
हे ही वाचा:
कर्नाटकातील डीजीपीचा नको त्या अवस्थेतील व्हीडिओ; केले निलंबित
आज कोणत्या शेअर्सवर ठेवाल लक्ष? ‘हे’ घटक ठरवतील बाजाराची दिशा!
“आम्ही नोबेल पुरस्कार देत नाही” नॉर्वेच्या पंतप्रधानांनी हात झटकले
२०२५ मध्ये बांगलादेशात अल्पसंख्यांकांशी संबंधित ६४५ गुन्हेगारी घटना
इतर राज्येही दावोसला गुंतवणूक मिळविण्यासाठी आली आहेत, त्यांच्याशी असलेल्या स्पर्धेविषयी फडणवीस म्हणाले की, सर्व राज्यात चांगली स्पर्धा आहे. अर्थात, सगळ्यांना मिळणारी गुंतवणूक ही भारतातच येणार आहे. पण आम्ही ती महाराष्ट्रात यावी यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. गुंतवणुकीचे जे आकडे आले आहेत. त्या महाराष्ट्र नंबर वन आहे. आमची धोरणे यशस्वी होत आहेत. पण टॅरिफचा गुंतवणूकीवर मोठा परिणाम होत आहे असे वाटत नाही. काही उद्योगांना त्याचा त्रास होत आहे, पण आम्ही त्यांना सहाय्य करत आहोत.
