बरेलीतील मौलाना विसरलेत राज्यात कोणाची सत्ता; धडा शिकवणार

बरेलीमधील हिंसाचारानंतर योगी आदित्यनाथ यांचा इशारा

बरेलीतील मौलाना विसरलेत राज्यात कोणाची सत्ता; धडा शिकवणार

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर मोठा गोंधळ उडाला. मौलाना तौकीर रझा यांच्या पदयात्रेच्या घोषणेला प्रतिसाद म्हणून जमलेल्या जमावाला रोखण्यात आल्यानंतर दंगल उसळली. जमावाने केलेल्या दगडफेकीत आणि गोळीबारात दहा पोलिसांसह काही लोक जखमी झाले. पोलिसांनी लाठीचार्ज आणि इतर उपाययोजनांचा वापर करून दंगल आटोक्यात आणली. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रात्री उशिरा कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणावर म्हटले आहे की, “बरेलीतील एक मौलाना विसरले की, राज्यात सत्तेत कोण आहे आणि त्यांना वाटले की ते केव्हाही व्यवस्था उलथवून टाकू शकतात. परंतु, आम्ही स्पष्ट केले की नाकेबंदी किंवा कर्फ्यू राहणार नाही.” पुढे योगी म्हणाले की, आम्ही शिकवलेले धडे भावी पिढ्यांना दंगल करण्यापूर्वी दोनदा विचार करायला लावतील. सुव्यवस्था बिघडवण्याचा हा कसला मार्ग आहे? २०१७ पूर्वी उत्तर प्रदेशात हाच प्रकार होता, परंतु २०१७ नंतर आम्ही कर्फ्यूही लागू करू दिलेला नाही. उत्तर प्रदेशच्या विकासाची कहाणी येथून सुरू होते,” असे योगी म्हणाले.

मुख्यमंत्री योगी म्हणाले की, मागील सरकारांमध्ये दंगलखोरांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले जात असे आणि त्यांचा सन्मान केला जात असे. दंगलखोरांचे आदरातिथ्य केले जात असे आणि सत्तेत असलेले व्यावसायिक गुन्हेगार आणि माफियांना सलाम करत असत.

हे ही वाचा : 

पाकिस्तानने पंजाब प्रांताचा वापर शेजारील देशाविरोधात केला! काय म्हणाले बलोच नेते?

खालिस्तानी दहशतवादी परमिंदर सिंग पिंडीचे यशस्वी प्रत्यार्पण; युएईमधून आणले भारतात

पाकची नाटकं; दहशतवाद पोसण्याचे तथ्य लपवू शकत नाहीत!

दादासाहेब फाळके चित्रनगरीकडून पूरग्रस्तांसाठी ५ लक्ष रुपयांची मदत!

बरेलीमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसक निदर्शनांच्या संदर्भात पोलिसांनी इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल (आयएमसी) प्रमुख मौलाना तौकीर रझा यांना ताब्यात घेतले आहे. “आय लव्ह मोहम्मद” या घोषणेला समर्पित निदर्शनादरम्यान हिंसाचार उसळला होता. यामध्ये तोडफोड, दगडफेक आणि पोलिसांवर गोळीबार यांचा समावेश होता. पोलिसांनी आतापर्यंत १,७०० अज्ञात आणि काही ज्ञात व्यक्तींविरुद्ध १० एफआयआर नोंदवले आहेत. या घटनेच्या संदर्भात ३९ जणांना अटक देखील केली आहे.

Exit mobile version