राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली असून नव वर्षाच्या पूर्वसंध्येला केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. टोंक जिल्हा विशेष पथकाने (DST) मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर स्फोटके जप्त केली आहेत. या कारवाईत पोलिसांनी बुंदी जिल्ह्यातून दोन संशयितांना अटक केली असून तस्करीत वापरलेली मारुती सियाझ कार जप्त केली आहे.
टोंक पोलिसांच्या जिल्हा विशेष पथकाने बुधवारी दोन जणांना अटक केली आणि त्यांच्या कारमधून १५० किलो स्फोटके जप्त केली. विशेष पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, एक आलिशान गाडी बुंदीहून टोंकला स्फोटके घेऊन जात आहे. पथकाने बरौनी पोलिस स्टेशन परिसरात नाकाबंदी केली आणि संशयास्पद मारुती सियाझ वाहन थांबवले. झडती दरम्यान, कारमधून स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. आरोपींनी कारवाईपासून बचावण्यासाठी युरिया खताच्या पिशव्यांमध्ये १५० किलो अमोनियम नायट्रेट लपवले होते. यासोबतच काडतुसे आणि सेफ्टी फ्यूज वायरचे सहा बंडल देखील जप्त करण्यात आले.
डीएसपी मृत्युंजय मिश्रा यांनी सांगितले की, डीएसटीने बरोनी पोलिस स्टेशन परिसरात एका कारला रोखण्यासाठी गुप्त माहितीवरून कारवाई केली. युरिया खताच्या पोत्यांमध्ये लपवून ठेवलेले सुमारे १५० किलो अमोनियम नायट्रेट जप्त केले. आरोपी स्फोटक पदार्थ बुंदीहून टोंक येथे पुरवठ्यासाठी घेऊन जात होते. पोलिसांनी अमोनियम नायट्रेट व्यतिरिक्त २०० काडतुसे आणि सुमारे ११०० मीटर लांबीच्या सेफ्टी फ्यूज वायरचे सहा बंडल जप्त केले. साहित्य वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार देखील जप्त करण्यात आली.
हे ही वाचा:
“ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालचा नाश केला आहे”
नुसरत भरुचाने केले महाकाल दर्शन, मौलाना भडकले
मतदानापूर्वी भाजपचा पहिला विजय
भारताने चीनवर लादले तीन वर्षांचे स्टील टॅरिफ; कारण काय?
जप्त केलेल्या स्फोटक साहित्याचा स्रोत, हेतू वापर आणि संभाव्य दुवे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. पोलीस आरोपींची चौकशी करत असून हे समान खाणकामासाठी वापरण्यात येणार होते की बेकायदेशीर कामांसाठी होते याची तपासणी केली जात आहे.
गेल्या महिन्यात दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात इतर उच्च दर्जाच्या स्फोटकांसोबत खत म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे अमोनियम नायट्रेट हे पांढरे स्फटिकासारखे रसायन वापरले गेले होते. या स्फोटात १२ लोक दगवले तर अनेक जण जखमी झाले होते.
