केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पनपुझा भागात प्रमोद आणि बिनेश या दोन स्थानिक तरुणांना अजगराची शिकार करून त्याचे मांस शिजवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. १० सप्टेंबर रोजी, त्यांच्या घराजवळील रबराच्या मळ्यातून त्यांनी एका प्रौढ अजगराला पकडून ठार मारले आणि त्यानंतर प्रमोदच्या घरी त्याचे मांस शिजवून करी तयार करण्यात आली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
ही माहिती थालीपरंबा वनक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर, रेंज अधिकारी सुरेश पी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून अजगराचे काही अवशेष आणि शिजवलेले पदार्थ जप्त केले. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांविरुद्ध “वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२” अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवारी (११ सप्टेंबर) आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अजगर हा संरक्षित प्रजातींच्या यादीत समाविष्ट असल्यामुळे त्याची शिकार करणे गंभीर गुन्हा मानला जातो. या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून, वन विभागाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्राणी प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा :
ब्राझील: सत्तापालटाच्या कटासाठी माजी राष्ट्रपतीला २७ वर्षांची शिक्षा!
नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणारे कुलमान घिसिंग कोण आहेत?
छत्तीसगडमध्ये चकमक: १ कोटींच्या इनामी कमांडर बालकृष्णसह १० नक्षली ठार!
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी तेलंगणामध्ये एका युट्युबरने त्याच्या चॅनलवर ‘मोराची करी’ बनवतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.हा व्हिडिओ सोशल मोडियावर अपलोड होताच अनेकांनी जोरदार विरोधक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आणि व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी अखेर कारवाई करत त्याला कारवाई केली आणि तो व्हिडिओ देखील युट्युबवरून काढून टाकण्यात आला.
