बांगलादेशातील हिंदू महिलेवरील बलात्काराने जगभरात संताप!

बांगलादेश नॅशनल पार्टीच्या फजोर अलीला अटक

बांगलादेशातील हिंदू महिलेवरील बलात्काराने जगभरात संताप!

बांगलादेशातील कोमिल्ला जिल्ह्यातील मुरादनगर भागात २१ वर्षीय हिंदू मुलीवर झालेल्या बलात्काराच्या क्रूर घटनेने देशभर संताप व्यक्त केला आहे. ही घृणास्पद घटना घडली तेव्हा ही मुलगी ‘हरिसेवा’ नावाच्या स्थानिक धार्मिक उत्सवानिमित्त तिच्या वडिलांना भेटण्यासाठी आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने चाकूचा धाक दाखवत मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि घटनेचा व्हिडिओही बनवला. पीडितेला धमकी देण्यात आली की जर तिने पोलिसात तक्रार केली तर तिला ठार मारले जाईल.

या प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्थानिक बीएनपी (बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी) नेता फजोर अली असल्याचे सांगितले जाते, ज्याने पीडितेवर केवळ बलात्कार केला नाही तर पीडितेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. तर पीडितेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल इतर तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या घटनेनंतर मुरादनगर आणि कुमिल्लाच्या आसपासच्या भागात लोकांचा संताप रस्त्यावर आला. स्थानिक लोकांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. संपूर्ण बांगलादेशात या घटनेबद्दल संताप आहे आणि लोक सोशल मीडियावरही उघडपणे न्यायाची मागणी करत आहेत.

हे ही वाचा : 

पश्चिम बंगाल भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार कोठडीतून बाहेर

भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत चेंगराचेंगरी, ३ जणांचा मृत्यू!

इंदूर-देवास रस्त्यावर २४ तासांहून अधिक काळ जीवघेणा जाम, ३ जणांचा मृत्यू

बिहार बनले देशातील पहिले राज्य जिथे मोबाईलद्वारे मतदान

ही घटना २६ जून रोजी घडली, जेव्हा रामचंद्रपूर पचकिता गावातील ३८ वर्षीय आरोपी फजोर अली रात्री १० वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या घरात घुसला. पिडीत महिलेचा पती दुबईमध्ये काम करतो, ती स्थानिक धार्मिक उत्सवानिमित्त तिच्या वडिलांना भेटण्यासाठी घरी आली होती.

तक्रारी नुसार, पीडितेने दार उघडण्यास नकार दिल्यानंतर आरोपी अलीने जबरदस्तीने घरात प्रवेश केला आणि तिच्यावर हल्ला केला. यानंतर स्थानिकांनी आरोपीला पकडून मारहाण केली परंतु तो घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर पहाटे ५ वाजता पोलिसांनी ढाक्यातील सय्यदाबाद परिसरातून फजोर अलीला अटक केली.

२७ जून रोजी पीडितेने दाखल केलेल्या लेखी तक्रारीवरून महिला आणि बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरादनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Exit mobile version