दिल्लीतील माफियांनी त्याला अंध केले, भीक मागायला लावली, पण…

A man escapes from Delhi begging mafia even after bearing a torture and turned blind.

दिल्लीतील माफियांनी त्याला अंध केले, भीक मागायला लावली, पण…

बिहारमधील एक रोजंदारी मजूर कानपूरमध्ये आपल्या मोठ्या भावासोबत राहत होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी कामाचे शोधात बेपत्ता झालेला सुरेश मांझी शरीरावर असंख्य जखमांसोबत परतला .

हे ही वाचा:

नवाब मलिक यांची एवढी संपत्ती होणार जप्त

मुंबई पोलिसांच्या ‘ऑपरेशन रीयुनाईट’ची यशस्वी कामगिरी

भारताने कुवेतला कुवत दाखवत जिंकले सुवर्ण

सुरेश कामाच्या शोधात दिल्लीला गेल्याचे कळले. त्याच्या संपूर्ण शरीरावर जखमांच्या खुणा घेऊन तो शुक्रवारी परतला. सुरेश मांझी याने उघड केले की त्याला एका टोळीने भीक मागण्यास भाग पाडले. माहितीनुसार त्या टोळीने त्याच्या डोळ्यात केमिकल टाकून त्याला कायमचे आंधळे केले.अत्याचाराची बातमी कळताच जवळचे रहिवाशी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जमले. आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. त्यापैकी दोन कानपूरचे आहेत. नंतर पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला. “गुलाबी बिल्डिंग परिसरातील एका विजय नावाचा व्यक्तीने मला चांगली नोकरी देण्याचे वचन दिले . तो मला एका महिलेच्या घरी घेऊन गेला आणि तिथे त्याने मला अंध केले. त्याने मला दिल्लीतील राज नावाच्या भिकारी माफियाला विकले. त्यानंतर राजने मला हरियाणात पाठवले आणि भीक मागण्यास भाग पाडले”, सुरेश म्हणाला. सुरेशला त्रास देणाऱ्यांनी त्याला लोखंडी रॉडने मारले आणि मादक पदार्थांचे इंजेक्शन दिले. भिक मागितली नाही तर खायला मिळणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली. “मादक पदार्थांच्या प्रचंड डोसनंतर, जेव्हा माझी प्रकृती बिघडली, तेव्हा राजने मला विजयसोबत कानपूरला परत पाठवले, जिथे मला पुन्हा भीक मागण्यास भाग पाडले गेले. गुरुवारी मी पळून जाण्यात यशस्वी झालो. स्थानिकांच्या मदतीने मी कसा तरी माझ्या भावाच्या ठिकाणी पोहोचलो,” तो पुढे म्हणाला.

पोलिसांनी सांगितले की, सुरेशला शहरातील सर्व प्रमुख क्रॉसिंगवर उभे राहून पहाटेपासून संध्याकाळपर्यंत विनाविलंब भीक मागण्यास सांगण्यात आले. दिवसाअखेरीस, त्याचे अपहरणकर्ते त्याने जमा केलेली रक्कम हिसकावून घ्यायचे. “आम्ही अपहरण आणि छळाचा गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा तपास करत आहोत. एक टीम तयार करण्यात आली आहे आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी छापे टाकले जात आहेत.” डीसीपी प्रमोद कुमार म्हणाले.

Exit mobile version